नगराध्यक्ष, नगरसेवकाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढली

नगराध्यक्षांना ११ लाखांपर्यंत तर नगरसेवकांना ५ खर्च करता येणार

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
गोंदिया,
election expenditure येत्या २ डिसेंबर रोजी होणार्‍या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख ते १५ लाख २५ हजार रुपयांपर्यंत तर नगरसेवकपदासाठी अडीच लाख ते पाच लाखांपर्यंत नगरपालिकांच्या वर्गवारीनुसार निवडणुकीत खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख आज गुरुवार २१ नोव्हेंबर असून निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराची यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. तसेच निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी २६ रोजी जाहीर होणार आहे. तर २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे.
 
 

election expenditure 
 
 
निवडणूक आयोगाने नगरपरिषद, नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या खर्च मयदित वाढ केली आहे. ‘अ’ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी १५ लाख, सदस्यसपदासाठी १० लाखाची वाढ. तर ‘ब’ वर्ग परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ११ लाख २५ हजार, सदस्य पदासाठी ३ लाख ५० हजार खर्च मर्यादा केली आहे. ‘क’ वर्ग नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी ७ लाख ५० हजार, सदस्यपदासाठी २ लाख ५० हजार रुपयांची खर्च मर्यादा करण्यात आली आहे. नगर पंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी ६ लाख आणि सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा करण्यात आली आहे. महागाई, प्रचार साधनांचे दर, डिजिटल माध्यमांवरील खर्च आणि वाहनभाडे यांसारख्या बाबींचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
अ‍ॅपद्वारे मिळेल माहिती
मतदारांसाठी संकेत स्थळ विकसित केलं आहे. त्यावर सर्च फॅसिलिटी आहे. सर्च करून नाव आणि मतदान केंद्र शोधता येणार आहे. मतदारांसाठी मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. अ‍ॅपद्वारे मतदार यादी, मतदान केंद्र आणि उमेदवारांची माहितीही मिळेल असेही निवडणूक विभागाने म्हटले आहे.
वर्गवारीनुसार खर्चाची मर्यादा
गोंदिया जिल्ह्यातील दोन नगरपालिका व दोन नगरपंचायतीचे धुमशान सुरू आहे. यामध्ये गोंदिया व तिरोडा नगरपरिषद तर गोरेगाव व सारेकसा नगरपंचायत निवडणूका सुरू आहेत.election expenditure या पालिकांच्या वर्गवारीनुसार त्या-त्या उमेदवाराला त्या ठिकाणी खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यानुसार उमेदवाराला आपला खर्च दाखवावा लागणार आहे.