ईडीचे झारखंड-पश्चिम बंगालमध्ये ४० ठिकाणीवर छापे

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Jharkhand-West Bengal of ED झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रमुख कोळसा व्यापारी आणि कथित कोळसा माफियांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. रिपोर्टनुसार, या कारवाईत दिल्लीला बोलावण्यात आलेल्या एका प्रमुख कोळसा व्यापारी नरेंद्र खडका यांच्या एके ब्लॉक येथील निवासस्थानी विशेष तपास सुरू आहे. ईडीने एकाच वेळी कोळसा व्यापारी आणि कोळसा माफियांशी संबंधित अनेक घरे आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत.
 
 

ED 
रांची येथील ईडी पथकाने झारखंडमधील १८ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत कोळसा चोरी आणि तस्करीशी संबंधित अनेक प्रमुख प्रकरणांचा आढावा घेतला जात आहे. अनिल गोयल, संजय उद्योग, एल.बी. सिंह आणि अमर मंडल या व्यक्तींचा या प्रकरणांशी संबंध आढळला आहे. तपासात मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी झाल्याचे आणि शेकडो कोटी रुपयांचे सरकारी महसूल गमावल्याचे समोर आले आहे.
याचबरोबर, ईडीच्या दुसऱ्या पथकाने पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, पुरुलिया, हावडा आणि कोलकाता जिल्ह्यातील २४ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत बेकायदेशीर कोळसा खाणकाम, वाहतूक आणि साठवणुकीशी संबंधित प्रकरणांचा उलगडा झाला आहे. या ठिकाणी नरेंद्र खडका, अनिल गोयल, युधिष्ठिर घोष, कृष्णा मुरारी कायल आणि इतर अनेक जणांना लक्ष्य केले आहे. ईडीच्या या संयुक्त कारवाईला कोळसा माफिया नेटवर्कला मोठा धक्का मानले जात आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे होऊ शकतात. यापूर्वीही कोळसा व्यापारात अनियमिततेची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत.