महिलेवर चाकूहल्ला करणारा आरोपी ताब्यात

लाडखेड पोलिस ठाण्यांतर्गत घटना

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
knife attack Yavatmal तिवसा गावाजवळ दोन महिलांना एक व्यक्ती मारहाण करत आहे. त्याच्या हातात एक चाकू असल्याची माहिती पेट्रोलिंगवरील पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतले.

knife attack Yavatmal
गुरुवार, 20 नोव्हेंबर रोजी लाडखेड येथील ठाणेदार विनायक लंबे, प्रकाश रत्ने हे कामठवाडा परिसरात पेट्रोलिंगसाठी गेले असता कामठवाडा येथे knife attack Yavatmal पोलिस कर्मचारी प्रकाश रत्ने यांना एका अज्ञात वाहनचालकाने माहिती दिली की तिवसा गावाजवळ एक व्यक्ती दोन महिलांना बेदम मारहाण करीत आहे, त्याच्या हातात चाकू आहे. या माहितीच्या आधारे पोलिस पथक त्वरित पोहोचले. तेथे एका महिलेच्या पोटात चाकूचे घाव लागलेले जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याने तिला वाहनात बसवून विचारपूस केली असता तिचे नाव पूनम लखन जाधव (तिवसा) असे सांगितले. तिने रोडवर पुढे काही अंतरावर तिचा आरोपी नवरा तिच्या आईला चाकूने मारत असल्याचे सांगितले. पुढे गेल्यावर महिलेच्या पोटावर चाकूने वार करणाèयास पोलिसांनी ताब्यात घेऊन चाकू हस्तगत केला.
 
ठाणेदार लंबे यांनी वाहनचालक अनिस सय्यद यांच्या मदतीने जखमी महिला सुनंदा राठोड आणि घटनास्थळावरून जखमींना दारव्हा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे दोन्ही जखमी महिलांचे प्राण वाचले आहे. आरोपी लखन प्रकाश जाधव (वय 38, तिवसा) याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामकिशन जायभाये करीत आहेत.