नेर नगर परिषद अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात

बंडखोरांसह 87 उमेदवार कायम

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
नेर, 
ner-nagar-parishad : आगामी 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नेर नप निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजपा युती, उबाठा सेना भा.रा. काँग्रेस आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अप), वंचित बहुजन आघाडी व एआयएमआयएम या पक्षांचे मिळून पाच उमेदवार रिंगणात कायम असून एकूण 10 प्रभागातील 21 नगरसेवकांसाठी राजकीय पक्ष, अपक्ष व बंडखोर मिळून एकूण 87 उमेदवार आपले नशिब अजमावत असल्याचे चित्र आज शेवटच्या दिवशी एकूण 15 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निश्चित झाले आहे.
 
 
 
ner
 
 
 
नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलासाठी राखीव असलेल्या नप अध्यक्ष पदासाठी शिवसेना- भाजपा युतीच्या सुनीता पवन जयस्वाल ( शिवसेना), उबाठा सेना-भा. रा. कांग्रेस आघाडीच्या जयशी किशोर माकोडे (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अप) फरजाना इरफान अकबानी, वंचित बहुजन आघाडीच्या शहा रुबिना परविन सलीम शहा व एआयएमआयएमच्या आफरीन वाजिद खान यांच्यात लढत होत आहे.
 
 
नगरसेवक पदासाठी काही प्रभागात सरळ दोन उमेदवारात तर काही प्रभागात चौकोनी-पंचकोनी लढत होणार आहे. निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून मतदार कोणाच्या गळ्यात विजयी माळ घालणार, हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.