पालघर,
Palghar Road Accident पालघर जिल्हा, मोखाड: पालघर जिल्ह्यातील मोखाड परिसरात मोखाड – त्र्यंबकेश्वर – नाशिक रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. मोखाडा – त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगण घाटात एका आयशर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक दरीकडील बाजूला पलटी झाला. या अपघातात ५० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत, तर सुभाष दिवे (वय 28, रा. हाडे, जव्हार) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक येथे कामासाठी जातात. कमी प्रवास खर्चासाठी हे मजूर बहुतेकदा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा उपयोग करतात. या प्रकरणात सुमारे सहा ते सातच्या सुमारास नाशिकहून मोखाड्याकडे येणाऱ्या आयशर ट्रकमध्ये तब्बल ५० हून अधिक मजूर बसले होते.
तोरेंगण Palghar Road Accident घाटावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भयंकर अपघात घडला. अपघाताची माहिती मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला मिळताच रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात ४० हून अधिक मजूर गंभीर व हलक्या जखमींनी रूग्णालयात उपचार घेत आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, पोलिस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. अपघाताबाबत पुढील तपशील आणि अधिक जखमींची माहिती पोलीस देणार आहेत.