'त्या' चिमुकलीसाठी मालेगाव कोर्टात जनआक्रोश, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
डोंगराळे,  
public-outrage-in-malegaon-court मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे १७ नोव्हेंबरला घडलेली धक्कादायक घटना नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून खून करण्यात आले. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असताना नागरिकांनी संताप व्यक्त करत कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
 
public-outrage-in-malegaon-court
 
घटनेनुसार, मुलगी काही इतर मुलांसोबत अंगणात खेळत असताना आरोपीने सर्वांना चॉकलेट देऊन पीडित मुलीला घरी नेले. नंतर ती दिसेनाशी झाली. काही अंतरावर टॉवरच्या बाजूला तिचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासात प्राथमिक निष्कर्ष काढला की मुलीवर अत्याचार करून हत्या केली गेली आहे. public-outrage-in-malegaon-court आरोपी विजय खैरनार याला रात्रीच अटक करण्यात आली, आणि तपासात समोर आले की वडिलांशी झालेल्या वादातूनच हा अपराध झाला आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
न्यायालयीन परिसरात तणाव निर्माण झाला होता, याआधी महिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला होता तर तरुणांनी ठिय्या आंदोलन केले होते. कोर्टाच्या आवारात दोन्ही बाजूंना सुरक्षित बंदोबस्त ठेवण्यात आला. public-outrage-in-malegaon-court नागरिकांची मागणी होती की आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी. संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहता, आरोपीला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याचा प्रश्नही समोर आला होता. या घटनेमुळे मालेगाव आणि आसपासच्या नागरिकांमध्ये संताप आणि आक्रोशाची लाट आहे, आणि स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे.