आ. बकानेंची शिष्टाई, तडस यांची डोकेदुखी कमी

*डॉ. नरेंद्र मदनकर यांची नगराध्यक्षाची उमेदवारी मागे

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
देवळी, 
Rajesh Bakane : देवळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण अध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती भाजपाचे माजी उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर यांनी आज २१ रोजी आ. राजेश बकाने यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यानिमित्ताने आ. बकाने यांची शिष्टाई आणि माजी खासदार रामदास तडस यांची डोकेदुखी कमी झाली आहे.
 

tadas 
 
पत्रकारांसोबत बोलताना डॉ. मदनकर म्हणाले की आपण भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असून पक्षाची भूमिका हीच माझी अधिकृत भूमिका आहे. नगरपरिषद अध्यक्ष पदाकरिता भाजपाया शोभा तडस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षशिस्त पाळत आपण माझे नामनिर्देशन पत्र परत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार ठरविताना पक्षाने कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतले असते तर चांगले झाले असते. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घायला हवा होता.
 
 
पण, आपण कोणतीही नाराजी न बाळगता बिनशर्त नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. यापुढे पक्षाचा प्रचार कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करणार असून पक्ष एकजूट असून सर्व मिळून भाजपाचे उमेदवार निवडून आणणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या सोबत फोनवर चर्चा केल्याने आमदार राजेश बकाने यांच्या उपस्थितीत आपण अधिकृतपणे फॉर्म मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी खासदार रामदास तडस यांचे अनुभवी नेतृत्व आणि स्थिर मार्गदर्शन निर्णायक ठरले आहे.
 
 
हा निर्णय आ. बकाने यांच्या समन्वयक नेतृत्वामुळे व पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनामुळे घेण्यात आला असून भाजपाच्या अंतर्गत एकजुटीची प्रचिती यातून दिसून आली आहे. मदनकर यांनी अर्ज मागे घेतल्याने शोभा तडस यांच्या उमेदवारीसाठी भाजप एक संघ आहे.