गेटर नोएडा,
seema-haider पाकिस्तानी भाभी म्हणून ओळखल्या जाणारी सीमा हैदर या सध्या खूप आनंदात आहे. त्यामागेही कारण तितकेच खास आहे. दोन वर्षांपूर्वी चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा आणि तिचा साथीदार सचिन मीणा यांचे आयुष्य आता पूर्णपणे बदलून गेले आहे. त्यांची चर्चेत असलेली प्रेमकहाणी सोशल मीडियावर इतकी व्हायरल झाली की आजही लाखो लोक त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आणि या लोकप्रियतेमुळेच सीमा आणि सचिनचे नशीब खुलले आहे.
काही महिन्यांपूर्वी यूट्यूब कमाईवरून एक छोटा खोली बांधणारी सीमा आता ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा येथे नवे, आकर्षक आणि मोठे घर उभारत आहे. नव्या घराचे बांधकाम पाहून सीमा आणि सचिन आनंदाने नाचत आहेत. ते नियमितपणे यूट्यूबवर व्हिडिओ टाकून त्यांच्या चाहत्यांसोबत घराच्या प्रगतीबद्दल शेअर करत आहेत. seema-haider सीमा एका व्हिडिओत म्हणते की जुने घर खूप लहान होते. पाच मुलं आणि दोघे पती-पत्नी— एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी एका खोलीत राहणे फारच अवघड होतं. आता मात्र नव्या प्लॉटवर दोन मजली घर सुंदर पद्धतीने बांधले जात आहे.
सीमा आणि सचिन यांनी प्लॉट आणि घरावर किती खर्च झाला हे जाहीर केले नाही. पण एनसीआरमध्ये जमीन खरेदी आणि घर बांधण्याचा खर्च किती मोठा असतो याची कल्पना तिथल्या लोकांना सहज येते. सीमा भारतात आल्यानंतर सचिनने आधीची किराणा दुकानातील नोकरी सोडली. पूर्वी तो दिवसभर 8-10 तास काम करून जेमतेम पोटापाण्यापुरते कमवत होता. पण आता यूट्यूब आणि सोशल मीडियामुळे सीमा आणि सचिनची चांगली कमाई होत आहे. seema-haider ते केवळ कुटुंबाचा खर्चच भागवत नाहीत, तर प्लॉट आणि नव्या घराच्या रूपात मोठी संपत्तीही उभी करत आहेत.