वर्धा,
shop-selling-marijuana वडनेर-हिंगणघाट मार्गावर सोनेगाव शिवारातील एका पंचर दुरुस्तीच्या दुकानातून गांजाची विक्री होत असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर पुढे आला आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजासह १ लाख ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दित गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाईत पोलिसांनी साकिर फिरोज अन्सारी याच्या टायर पंचर दुरुस्तीच्या दुकानावर छापा टाकला. त्याला ताब्यात घेत झडती घेतली.shop-selling-marijuana रोख रक्कम, गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी, ५६६ गॅम गांजा, मोबाईल असा १ लाख ७९ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडु, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक यांनी केली.