समृद्धीवर उभ्या ट्रकची तोडफोड, क्लिनरला बदडले

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
truck-parked-on-samriddhi-vandalized समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी उभ्या केलेल्या ट्रकची कारमधून आलेल्या चार जणांनी तोडफोड करीत लीनरला बेदम मारहाण करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. ही घटना विरुळ टोलनाका परिसरात घडली. मोहम्मद गुलाम रसूल मोहम्मद आले नबी (४०) रा. नागपूर असे जखमी क्लिनरचे नाव आहे.
 
 
truck-parked-on-samriddhi-vandalized
 
मोहम्मद गुलाम रसूल मोहम्मद आले नबी हा क्लिनर असून तो एम. एच. ४०- बी. जी. ९१६४ या क्रमांकाचा ट्रकमध्ये गुरे घेऊन तेलंगाणा येथे जात होता. समृद्धी महामार्गावर विरूळ टोल नाका येथे लघुशंकेसाठी ट्रक थांबवला. दरम्यान, मागून स्कार्पिओमधून पाच ते सहा जण आले. त्यांनी ट्रकच्या खिडकीजवळ तोडफोड केली. यामुळे चालकाने ट्रक सुरू करून पळ काढला. लीनरने ट्रककडे धाव घेतली असता त्याला बेसबॉलच्या दांड्याने बेदम मारहाण केली. truck-parked-on-samriddhi-vandalized यात त्याचा मृत्यू झाल्याच्या भीतीने हल्लेखोरांनी त्याला रस्त्याच्या खाली फेकून दिले. पहाटे लीनरला शुद्ध येऊन घडलेल्या प्रकाराची माहिती ट्रक मालक शेख अयफाज यांना दिली. तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी अथर्व घोगडे रा. येळाकेळी, पीयूष निंबाळकर रा. आनंदनगर, मयक खंडागळे रा. नालवाडी, अर्श खैरकार रा. तिवारी ले-आउट वर्धा, यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.