तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा ‘धुमधडाका’ सुरू

यावर्षी नोव्हेंबरपासून जून अखेरपर्यंत 61 विवाह मुहूर्त

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
सतीश पापळकर

दारव्हा,
Tulsi Vivah, दरवर्षी तुळशी विवाह झाल्यानंतर लगेच लग्नसराईचा धुमधडाका सुरू होतो, यावर्षीही तसेच झाले. त्यामध्ये दै. तरुण भारतच्या सामूहिक तुळशीविवाह या स्तुत्य उपक्रमानंतर लगेच लग्नसराईला प्रारंभ झाला.
 
 
Tulsi Vivah
 
प्राप्त माहितीनुसार, यावर्षी नोव्हेंबरपासून जून 26 च्या अखेरपर्यंत जवळपास 61 विवाह मुहूर्त आहेत. वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशयनी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. द्वादशीला श्रीकृष्ण देव व तुळशीचा विवाह लावण्यात येतो.तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढण्याची परंपरा आहे. लग्नसराईच्या हंगामात मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय, सराफा बाजार, कपडे, कॅटरर्स, भांड्यांचे दुकानदार यांच्यासह सर्व संबंधित व्यापाèयांना मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी जास्त ग्राहक व उत्पन्न मिळण्याची आशा आहे. तुळशी विवाहानंतर विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.
डिसेंबर महिन्यात लग्नासाठी 4, 5, 6 या तीन शुभ तारखा आहेत. जानेवारी 2026 या महिन्यात शुक्र ग्रहाच्या दहनामुळे आणि इतर प्रतिकूल घटकांमुळे लग्नासाठी शुभमुहूर्त नसल्याचे कळते. फेब्रुवारीत 5, 6, 8, 10, 11, 12, 14, 19, 20, 21, 24, 25 आणि 26 या दिवशी विवाह मुहूर्त आहेत. मार्चमध्ये 1, 2, 3, 4, 7, 8, 11, 12 रोजी विवाह मुहूर्त आहेत. एप्रिल महिन्यात 15, 20, 21, 25, 26, 27, 28 आणि 29 तारखेला विवाह मुहूर्त आहेत.
 
 
मे महिन्यात हिंदू पंचांगामध्ये लग्नासाठी 8 शुभमुहूर्त आहेत. त्यात 1, 3, 5, 6, 7, 8, 13 आणि 14 मे या तारखांचा समावेश आहे. जून महिन्यात 21, 22, 23 मुहूर्त आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विवाह मुहूर्त नाहीत. नोव्हेंबरमध्ये 14 शुभमुहूर्त आहेत. त्यामध्ये 3, 6, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25, 27 आणि 30 नोव्हेंबर या तारखांचा समावेश आहे. यावर्षी एप्रिल, मे, जून महिन्यात 23 विवाह मुहूर्त आहेत. तर नोव्हेंबर ते मार्च दरम्यान मागील वर्षापेक्षा सर्वाधिक विवाह मुहूर्त 24, 25, 26, 27 आणि 29 जून या 8 तारखांना लग्नाचे मुहूर्त आहेत. यावर्षी नोव्हेंबरपासून जून अखेरपर्यंत 61 विवाह मुहूर्त असल्याचे समजते.