अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण यंदाचे अ‍ॅग्रोव्हिजन

शेती अवजारे बघण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
नागपूर,
agrovision 2025 शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि चालणार्‍या वाहनांसारख्या नवीन उपकरणांवर भर देणारे अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन यंदाचे विशेष आकर्षण ठरले आहे. कृषी प्रदर्शनात अ‍ॅग्रो टूरिझम, संत्रा,लिंबू, फळ रोपवाटिका, पूर्ती गॅस, अंकूर सिड्स, भाजीपाला उत्पादन वाढविण्यासाठी नैसर्गिक खतांचे अनेक स्टॉल या प्रदर्शनीत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती अवजारे बघण्यासाठी नागपूरसह लगतच्या मध्यप्रदेशातील शेतकर्‍यांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली
 

agrovision 2025  

कृषि प्रदर्शनात सिल्क साडी
धापेवाडा येथील टेक्सटाईल उद्योगाने सिल्क साडी तयार करण्यास सुरुवात केल्यानंतर आता सिल्क साड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना अ‍ॅग्रोव्हिजनच्या राष्ट्रीय कृषि प्रदर्शनात सिल्क साडी दिसताच त्यांनी सिल्क साडी तयार करणार्‍या महिलांकडून सखोल माहिती जाणून घेतली. धापेवाडाच्या सिल्क साडीला अल्पावधीतच एक नवीन ओळख निर्माण केल्याबददल महिलांचे कौतूक केले.
 
 
संपूर्ण प्रदर्शनीचे निरीक्षण
 
कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटानंतर केंद्रीय मंत्री आणि अ‍ॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री डॉ. आशीष जयस्वाल, सहकारिता मंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संपूर्ण प्रदर्शनीचे निरीक्षण करीत माहिती जाणून घेतली.
संत्रा उत्पादकाचे स्टॉलवर गर्दी
मुख्यत: या प्रदर्शनात दुग्धोत्पादन, शेतीमाल प्रक्रिया आणि निर्यातीला प्रोत्साहन देणारे अनेक स्टॉल आहेत. अ‍ॅग्रोव्हिजनच्या कृषि प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती अवजारे, कृषी उत्पादने आणि नाविन्यपूर्ण मशीनरीसह एलपीजी पूर्ती गॅस, अंकूर सिड्स, गृहउद्योग, संत्रा उत्पादकाचे स्टॉलवर मोठी गर्दी दिसून येत अमरावती मार्गावरील नागपूर विद्यापीठाच्या विशाल पटांगणावर उभारलेल्या या प्रदर्शनात ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगर, डवरणी यंत्रापासून अत्याधुनिक ‘अ‍ॅॅग्रो इंजिनिअरिंग’ तंत्रज्ञान वापरणारी यंत्रसामुग्री शेतकर्‍यांचे विशेष लक्ष केंद्रीत करीत आहे. याशिवाय औद्योगिक आणि लघुउद्योगांसाठी उपयुक्त अशा पोटॅटो पिलर, नायलॉन सेव मशीन, खोवा मशीन, नमकीन मशीन, हँडसिलर, हलदी बॉयलर, स्टोन चक्की यासारखी बहुपयोगी उपकरणे प्रदर्शनात आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान आणि जोडधंद्यांची माहिती
केंद्रीय मंत्री आणि अ‍ॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. विदर्भाला कृषी क्षेत्रात अग्रेसर बनवण्याचा उद्देश डोळयासमोर ठेवून दरवर्षी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्या जाते. यंदाच्या कृषी प्रदर्शनात शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि जोडधंद्यांची दिल्या जात असल्याची माहिती अ‍ॅग्रोव्हिजनचे आयोजक रवी बोरटकर यांनी दिली. अ‍ॅग्रोव्हिजनचे हे १६वे वर्ष असून या प्रदर्शनामुळे शेतकर्‍यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख, उत्पादनवाढ आणि समृद्धी यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
कृषीप्रेमींसाठी हे प्रदर्शन ज्ञानवर्धक
 
 
ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम अ‍ॅग्रोव्हिजनच्या कृषि प्रदर्शनात दिसून येतो. पहिल्या दालनात कार्यशाळा आणि कृषी शिक्षणासाठी उत्कृष्टरीत्या सुसज्ज सभागृहे आहेत. तर दुसर्‍या भागात व्यावसायिक प्रदर्शने आहेत. शेतकरी, विद्यार्थी आणि कृषीप्रेमींसाठी हे प्रदर्शन ज्ञानवर्धक आहे.
 
 
विविध उद्योगांचे दालन
 
 
याशिवाय ऍग्रो प्रॉडक्ट कंपनीचे ऑरगॅनो मशरूम या प्रदर्शनातील एक वेगळे आणि आकर्षक उत्पादन ठरत आहे. कॉफीचा अभिनव फ्लेवर, त्यासोबत मशरूम पावडर, सूप पावडर, पापड, यांसारख्या उत्पादनांचीही मोठी मागणी दिसून येत आहे.सरकारी योजनांच्या माध्यमातून सुरू झालेल्या विविध उद्योगांचे दालनही येथे उभारण्यात आले आहे. मध, इम्युनिटी बूस्टर्स, पोलन, घरगुती तेल घाणे, विविध प्रकारची स्थानिक उत्पादने आणि नवनवीन प्रक्रिया तंत्रज्ञान पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.
 
 

शेतकरी व उद्योजकांसाठी प्रेरणादायी
 
 
नवीकरणीय ऊर्जेतील प्रगतीचे दर्शन घडवणारे सोलर यंदाच्या प्रदर्शनातील महत्त्वाचा भाग आहे. महावितरणच्या मान्यताप्राप्त सोलर पॅनल, सोलर पंप, फेंसिंग आणि इतर अनेक सौर-आधारित साधने शेतीखर्च कमी करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. यूपीएल अ‍ॅग्री सोल्युशन्सने पेस्टिसाइड आणि फंगीसाइडची नवी श्रेणी सादर केली असून ती विशेषतः विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त आहे. जमिनीची पोत अबाधित ठेवत उत्पादनक्षमता वाढवणारी उत्पादने पिकाचा जोम, गुणवत्ता आणि उत्पन्न यावर परिणाम करते. अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान, नवनवीन उत्पादने, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि कृषीविश्वातील अनोखी नवकल्पना यांचा दिमाखदार संगम असलेले ऍग्रो व्हिजन हे प्रदर्शन शेतकरी व उद्योजकांसाठी खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरत असल्याची माहिती डॉ. पिनाक दंदे यांनी दिली.