नवी दिल्ली,
Alcohol is still forbidden in Islam इस्लाम धर्मात मद्यपान करणे हराम मानले जाते, कारण मद्यपानामुळे व्यक्तीचे स्वतःवरचे नियंत्रण सुटते आणि धार्मिकदृष्ट्या हे नकोसे आहे. त्यामुळे सौदी अरेबिया, कुवेत, पाकिस्तान यासारख्या मुस्लीम बहुल देशांत मद्यविक्रीवर पूर्ण बंदी आहे. मात्र मद्यपान हराम असूनही काही मुस्लीम देशांत मद्यपान केले जाते आणि काही ठिकाणी त्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक देशांत मद्यविक्रीमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होते.
सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये मद्यविक्रीवर पूर्ण बंदी आहे, परंतु बांगलादेश, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत गैरमुस्लीम व्यक्तींना परवाना घेऊन मद्यविक्री करण्याची संमती आहे. किर्गिजस्तानमध्ये बरेच मुस्लीम धर्मीय मद्यपान करतात, विशेषतः थंडीत व्होडका, बिअर, गोड वाईन आणि शॅम्पनचे सेवन वाढते. आनंदाच्या प्रसंगी व्होडका सर्वाधिक पिल्या जाते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे येथे गैरमुस्लिम रहिवासी आणि पर्यटकांना मद्यपान करण्यावर बंदी नाही. मुस्लिमांसाठी मद्यपान हराम आहे, पण परवाना असलेल्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेलमध्ये योग्य ठिकाणी मद्यविक्री करण्यास परवानगी दिली जाते.
पाकिस्तानमध्ये देशाची निर्मिती झाल्यानंतर तीन दशकांपर्यंत मद्यविक्री आणि सेवनाला परवानगी होती, परंतु झुल्फिकार अली भुत्तो यांच्या सरकारनंतर मद्यविक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली. सध्या मुस्लीम नागरिकांना मद्याची निर्मिती किंवा विक्री करता येत नाही, तर गैरमुस्लिमांना आर्थिक स्थिती लक्षात घेऊन परवाना घेऊन मद्यविक्री करण्याची परवानगी आहे. या प्रकारामुळे स्पष्ट होते की, इस्लाममध्ये मद्यपान हराम असले तरी काही मुस्लीम देशांत समाजिक, आर्थिक आणि पर्यटकांचे दृष्टिकोन लक्षात घेऊन काही प्रमाणात मद्यविक्री आणि सेवनाची परवानगी आहे.