नाेकरीच्या नावाने दाेघांना 20 लाखांची फसवणूक

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
jobs-fraud : केंद्रीय विद्यालयात शिक्षक तसेच लिपिकाची नाेकरी लावून देण्याचा दावा करत आराेपींनी दाेन जणांना 20 लाखांनी फसवले. राणाप्रतापनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
 
 
 
संग्रहित फोटो
 
 
 
राहुल यादवराव धायवट (40, राष्ट्रसंत नगर, गाेधनी मार्ग) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते एका  फार्मसी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीसाठी ते शिक्षिकेची नाेकरी पाहत हाेते. मे 2025 मध्ये त्यांची भेट निखिल कपनीचाेर याच्यासाेबत झाली. त्याने कुणाला सरकारी विभागात लिपिक किंवा चपराशी म्हणून नाेकरी हवी असेल तर सांगा, दिल्लीतील शर्मा ऊफर् माेसीन खान व हीज खान भुरेखान पठाण यांना पैसे देऊन काम हाेऊ शकेल असे सांगितले. निखिलने राहुल यांना मनाेज ज्ञानदेव बगाडे (अध्यापक ले आउट, त्रिमूर्तीनगर) यांच्याशी संपर्क करायला सांगितले. राहुल आराेपी मनाेजसाेबत आयटी पार्क मार्गावर भेटले. केंद्रीय विद्यालय, कामठी येथे ग्रंथपालाची जागा रिकामी असून तेथे नाेकरी हवी असेल तर 17 लाख रुपये लागतील असे मनाेज बगाडेने सांगितले.
 
 
त्याने अगाेदर नाेकरी लावलेल्या उमेदवारांचे नियुक्तिपत्र व ओळखपत्राचे  फोटाेदेखील राहुल यांना दाखविले. त्यामुळे राहुल यांचा विश्वास बसला व त्यांनी 10 मे ते 18 सप्टेंबरदरम्यान त्याला 15.50 लाख रुपये दिले. मनाेजने ते सर्व पैसे दिल्लीतील शर्माला दिल्याचा दावा केला. त्याने त्यानंतर त्यांच्या व्हाॅट्सअ‍ॅपवर नियुक्तिपत्र पाठविले. काही दिवसांनी त्याने सुधारित नियुक्तिपत्र पाठविले. मात्र, नाेकरीवर रुजू हाेण्याची तारीख पुढे गेल्याचे सांगितले.
 
 
ऑगस्ट महिन्यात त्याने परत एक पत्र पाठविले. मात्र, नेमके पत्नीने नाेकरीवर रुजू कधी व्हायचे याबाबत सांगण्यस ताे टाळाटाळ करत हाेता. राहुल यांनी चाैकशी केली असता आराेपी मनाेज बगाडेने अमित बन्साेड (21, गणेशनगर, नंदनवन) याला अंबाझरी येथील केंद्रीय विद्यालयात चपराशाची नाेकरी लावून देण्याची बतावणी करत पाच लाख रुपये घेतल्याची बाब समाेर आली. अखेर राहुल यांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली. पाेलिसांनी मनाेज बगाडे, शर्मा ऊफर् माेहसीन खान तसेच हीज खान भुरेखान पठाण यांच्याविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आराेपींनी अशा प्रकारे विदर्भातील अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.