धंताेलीतील वाहतूक काेंडीवर न्यायालयाने फटकारले

- पाेलिस आयुक्त, मनपा आयुक्तांना कारवाईचा इशारा

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Dhantoli Traffic Congestion : धंताेली, काॅंगे्रसनगर, रामदासपेठेतील वाहतूक काेंडी, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम कायम असल्यामुळे वेळाेवेळी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपा आयुक्त व पाेलिस आयुक्तांना कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे. याचिकाकाकर्त्याने शुक्रवारी वाहतूक समस्येचे व अतिक्रमणाची छायाचित्रे न्यायालयात सादर केले. न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या समक्ष ही सुनावणी झाली. अतिक्रमण आणि वाहतुकीच्या समस्यांची छायाचित्रे पाठविण्यासाठी माेबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा पाेलिस आयुक्त व मनपा आयुक्त यांना 25 नाेव्हेंबरपूर्वी सादर करण्याचे आदेश दिलेत.
 
 
NGP
 
 
 
उच्च न्यायालयाने गुरूवारी याचिकाकर्त्याला धंताेली परिसरातील अतिक्रमण व वाहतूक समस्येचे छायाचित्र सादर करण्यासही सांगितले हाेते. न्यायालयाच्या आदेशानंतरही अतिक्रमण, वाहतुकीची समस्या कायम आहे. आदेशाची अंमलबजावणी हाेत नाही, असे न्यायालयाने माैखिकपणे म्हटले आहे. न्यायालयाने मनपा व पाेलिस विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांची नावे याचिकाकर्त्याला मागितली हाेती. धंताेली, रामदासपेठ व काॅंगे्रसनगरातील हाॅस्पिटल व पार्किंगची समस्या मिटविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मंडळाने जनहित याचिका दाखल केल्या आहेत. विविध हाॅस्पिटलने आपल्या पार्किंग जागेवर अतिक्रमण केले आहे.
 
 
यावर कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकारी अशस्वी ठरले आहेत. त्यामुळे हायकाेर्टाने संबंधित अधिकाऱ्यांविरूध्द कारणे दाखवा नाेटीस बजावत कारवाई का करू नये, असे माैखिकपणे विचारणा केली आहे. हायकाेर्टाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे संबंधित अधिकाèयांविराेधात कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला. यावर हायकाेर्टाने संबंधित अधिकाऱ्यांना तीन आठवड्ंयात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिलेत. याचिकाकर्त्यार्ते अ‍ॅड. आशुताेष धर्माधिकारी, अ‍ॅड. देशपांडे, मनपार्ते अ‍ॅड. जेमिनी कासट, सरकारर्ते अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.