कारंजा (घा.),
sumit-wankhede : तालुक्यात जून महिन्यामध्ये संत्रा व मोसंबी पिकाचा मृगबहार गळला. तालुयातील बरेच शेतकरी संत्रा, मोसंबी उत्पादक आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुयातील संत्रा, मोसंबी उत्पादक डबघाईस आला आहे. त्यामुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावे या मागणीचे निवेदन परिसरातील शेतकर्यांनी आ. सुमित वानखेडे यांना दिले.
मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे संत्र्याला मृग बहाराची फूट झाली आणि नंतर पावसाच्या खंडामुळे व उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र संत्रा, मोसंबी मधील मृगबहार गळाला. परिणामी संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडला. आ. सुमित वानखेडे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुरवठ्यामुळे संत्रा मोसंबी, उत्पादक शेतकर्यांसाठी निधी मंजूर झाला. संत्रा, मोसंबी नुकसानीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले. परंतु, मदत निधी मात्र शेतकर्यांच्या खात्यावर अद्याप जमा झाला नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या खात्यात तो मदत निधी जमा करण्यात यावा अशी विनंती संत्रा उत्पादक शेतकर्यांनी आ. सुमित वानखेडे यांच्याकडे केली.
यावेळी तालुयातील प्रदीप शेटे, विलास भांगे, प्रफुल रेवतकर, रमेश शेटे, सचिन बोडखे, गजानन बोडखे, संदीप बोडखे, धनराज मानमोडे, मुरलीधर राकस, राकेश बनगरे, तुळशीराम पठाडे, संजय खवशी, मोरेश्वर सवाई, प्रवीण श्रीराव, भागवत नासरे, आदी उपस्थित होते.