घोराड,
forest reserve dam सेलू तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले जात आहे. तालुक्यातील जामणी येथे लोक सहभाग व सहकार्याने वनराई बंधारा तयार करण्यात आला. गावा नाजिक असलेल्या पांदन रस्त्याला असणार्या शेत शिवारातील नाल्यावर वनराई बंधारा तयार करण्यात आल्याने तेथील शेतकर्यांना काही प्रमाणात लाभ होणार आहे.
ग्रामपंचायतने या अभियानांतर्गत अनेक उपक्रम राबविले असून प्लास्टिक मुत गाव, सप्ताईक आरोग्य शिबिर, वृक्ष रोपणासह गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे.forest reserve dam या उपक्रमाला ग्राम पंचायत अधिकारी संतोष शिंदे, सरपंच कैलास बुधबावरे, उपसरपंच राजेंद्र कुनघटकर, सदस्य तसेच अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, उमेद, महिला बचत गट व ग्रामस्थ हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत आहे