मतभेद विसरून प्रत्येक उमेदवार विजयी करा : ना. बावनकुळे

वर्धेत विजय संकल्प सभेत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे टोचले कान

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
वर्धा,
bawankule मतदानासाठी काहीच दिवस बाकी आहे. आपसी मतभेद विसरून पूर्ण ताकद वापरून पक्षाला विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. जनतेला आता फत विकास हवा आहे. अंतर्गत मतभेद विसरून विकासाच्या मुद्यावरच ही निवडणूक केंद्रित करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी केले. स्थानिक हेरिटेज सभागृहात शुक्रवार २१ रोजी आयोजित भाजपाच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. राजेश बकाने, आ. समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, प्रशांत बुर्ले आदींची उपस्थिती होती.
 
 

bawankule 
 
 
भाजपचे निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीवर हल्ला केला. महाराष्ट्राच्या जनतेने ५१ टक्के म्हणजेच ३ कोटी १८ लाख मतांसह फडणवीस सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. डबल इंजिन सरकारच विकासाचा मार्ग उघडू शकते. शिवाय याच विश्वासावर अनेक नगरपालिका पक्षाने अविरोध जिंकली आहे. विकासाच्या मुद्यांवर भाजप पालिकांची निवडणूक जिंकेल, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आता कोणताही वैचारिक आधार उरलेला नाही. ठाकरे गटाने काँग्रेसच्या विचारधारेला स्वीकारले आहे. हिंदुत्व सोडल्यामुळे ते काँग्रेससोबत गेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेससोबत राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याची टीका त्यांनी केली. सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार आहे. ही निवडणूक सत्तेसाठी किंवा प्रतिष्ठेसाठी नाही, तर विकास योजनांना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. जिथे महायुतीचे औपचारिक गठबंधन झाले नाही, तिथे मैत्रिपूर्वक लढत होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी केवळ मतभेद आणि मतभेदांमुळे संघर्ष होऊ देऊ नये. सन २०२९ पर्यंत काँग्रेस सर्वात लहान पक्ष बनेल. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांपासून २०२९ पर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी हळूहळू कमजोर होत जाईल. भाजपमध्ये जे नेते समाविष्ट होत आहेत ते पद किंवा तिकिटासाठी नाही तर विकसित महाराष्ट्र या संकल्पासाठी येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे.bawankule यामुळे अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. सर्वांना उमेवारी देता येणार नाही.भाजप आणि महायुतीच राज्य व देशाच्या विकासाच्या दिशेने पुढे नेत आहेत, असेही ना. बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, यावेळी पक्षाकडे टिकिट मागणारे अधिक होते. एका प्रभागातुन एका जागेसाठी किमान ४ पेक्षा अधिक दावेदार होते. त्यामुळे एकाला टिकिट मिळाल्याने बाकीचे नाराज झाले त्यांच्याकडे पक्ष दुर्लक्ष करणार नाही. त्यांची सर्व कामे केल्या जाईल. त्याचा सन्मान पक्षात कायम राहील. ही निवडणूक पक्षासाठी महत्त्वाची आहे. सर्वानी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी विजय आपलाच असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.