पराग मगर
नागपूर,
hydroponic tower-agro vision भाजीपाला पिकवायचा आहे परंतु जागा नाही, अशी ओरड फ्लॅट संस्कृतीत राहणारे बहुतेक जण करीत असतात. परंतु हायड्राेपोनिक टाॅवरच्या माध्यमातून अत्यंत कमी जागेत, कमी पाण्यात कुठल्याही भाजीपिकाची लागवड हायड्राेापोनिक टाॅवरच्या माध्यमातून शक्य आहे. सध्या नागपुरात 'टॉक ऑफ द टाऊन' बनलेल्या अॅग्राे व्हिजन २०२५ मध्ये आलेल्या एका स्टार्टअपने हे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे नागपुरातीलच एका कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

hydroponic tower-agro vision याविषयी ओम भरडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायड्राेपोनिक टाॅवरमध्ये झाडे लावण्यासाठी काही खचके दिले आहेत. त्यात काेकाेपीटमध्ये हवे ते झाड लावले जाऊ शकते. प्रदर्शनात त्यांनी या खचक्यांमध्ये जवळपास 35 काेटी लावल्या हाेत्या. वापरकर्त्याला हवे ते झाड यात लावता येते. विशेष म्हणजे 1 ते दीड फूट जागेवर हे टाॅवर उभे करता येते. यामध्ये सर्वात खाली सिंचनासाठी पंप लावला आहे. खाली असलेल्या ड्रममध्ये एकावेळी जवळपास 50 लिटर पाणी मावते. ते पाणी माेटारच्या सहाय्याने वरून खाली पडते. त्यामुळे ते प्रत्येक राेपावर झिरपते. आठवड्याभरात यातील केवळ 10 लिटर पाणी उपयाेगात येते आणि 40 लिटर पाणी शिल्लक राहते. परिणामी या प्रणालीने माेठ्या प्रमाणात पाण्याची बचत हाेत असल्याचे ओम सांगताे.
गॅलरीत भाजी लागवड शक्य
hydroponic tower-agro vision फ्लॅटमुळे बहुतेकांच्या घरी जागा नसते. अशा वेळी गॅलरीत या टाॅवरमध्ये बरीच झाडे लावणे शक्य आहे. पाण्यात जैविक खत टाकून पिकांना आवश्यक पाेषणतत्वेही दिली जाऊ शकतात. परिणामी ऑरगॅनिक भाज्या घरीच पिकवून त्यांचा आहारात वापर या माध्यमातून शक्य आहे. या टाॅवरमध्ये टमाटर, भेंडी, चवळी, मिरची अशा विविध भाज्या लावल्या जाऊ शकतात.