जी-२० परिषदेत मोदी–मेलोनींची भेट...व्हिडीओ व्हायरल

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
जोहान्सबर्ग,
Modi-Meloni meeting जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची अनौपचारिक पण महत्त्वपूर्ण भेट झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस करत द्विपक्षीय संबंधांच्या वाढत्या बळकटीबद्दल समाधान व्यक्त केले. भारत-इटली सहकार्य संरक्षण, सुरक्षा, व्यापार, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सातत्याने विस्तारत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
 
Modi-Meloni meeting
 
या भेटीत रिओ डी जानेरो येथील अलीकडील जी-२० चर्चांचा उल्लेख करत दोन्ही देशांनी २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी तयार केलेल्या संयुक्त धोरणात्मक कृती आराखड्याला गती देण्याचा निर्धारही व्यक्त केला. जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडींवर चर्चा करताना युक्रेन संकट, हवामान बदल आणि जागतिक व्यापारातील अनिश्चितता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली. मोदी आणि मेलोनी यांची ही भेट भारत-इटली संबंधांतील वाढत्या विश्वासाचे सूचक मानली जात आहे. २०२४ मधील जी-७ आणि जी-२० परिषदांनंतर ही दोन्ही नेत्यांची तिसरी प्रत्यक्ष चर्चा असून जागतिक राजनैतिक वातावरणात सकारात्मक सहकार्याचे हे आणखी एक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.