चिखली,
municipal-council-general-election : सर्वत्र नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्याला अनुसरून मतदानाचा टक्का वाढावा या हेतूने चिखली पंचायत समिती अंतर्गत मूल्यवर्धन प्रशिक्षण श्री. शिवाजी डी. एड. महाविद्यालयात सुरू आहे.

त्यामध्ये तालुक्यातील सर्वच शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत त्यामध्ये राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग असावा ह्या प्रांजळ हेतूने चिखली नगर पालिका येथे होणाऱ्या निवडणुकी मध्ये सर्व स्तरातील मतदारांनी मतदान करावे व कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही असा संदेश देणारी प्रभात फेरी काढली ज्यामध्ये "मतदान करा" असा संदेश दिला. यामध्ये पंचायत समितीचे मा. गटशिक्षणाधिकारी भास्करराव वाघमारे, विस्तार अधिकारी मोरे साहेब,इंगळे साहेब, केवट साहेब, अनाळकर साहेब, गट समन्वयक प्रवीण वायाळ सर, केंद्रप्रमुख बलकार सर, सवडतकर सर, न. प. चे प्रशासन अधिकारी शकील सर,तालुका समन्वयक सीमा वानखेडे, वैशाली सुरडकर, मूल्यवर्धन उपक्रम चिखली तालुका समन्वयक वर्षा सोनोने , स्वीप चमू चे गणेश अंभोरे, विकास जाधव, शाम घुगे, गजानन काळे, गजानन भवर, सुधीर शेटे,विनोद कुटे, मंगेश कापसे, निलेश भारोडकर, योगेश कुलवंत, यशवंत खाकरे, अनिल गवई,विष्णूअवचार याची प्रामुख्याने उपस्थिती होती