कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव

शेतकरी आर्थिक संकटात

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
वरूड,
red blight on cotton वरूड तालुक्यात यंदा कापूस पिकावर ‘लाल्या’ रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसाच्या पिकाची वाढ खुंटणे, पानगळ, बोंडांची संख्या कमी होणे अशा गंभीर समस्यांमुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यंदा सुरुवातीपासूनच कापूस पिकाची लागवड मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली होती, त्यात आता रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या कापसाला बाजाराते ६,५०० ते ६, ८०० रुपये इतकाच भाव मिळत असून उत्पादन घटल्यामुळे शेतकर्‍यांना झालेला खर्च देखील निघत नाही.
 
 

कापूस  
 
 
बाजारात दर वाढण्याची शक्यता कमी दिसत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्रा, मोसंबी यासारख्या पिकांना शासनाने भरघोस मदत जाहीर केली. मात्र कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळाली नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. आता कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना शेतकर्‍यांची स्थिती आणखीनच कठीण झाली आहे. कापूस पिकावरील रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून, शासनाने तातडीने सर्वेक्षण करून पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे.red blight on cotton पिकाचा अपेक्षित उत्पन्नावर परिणाम झाल्यास शेतकर्‍यांवर दिवाळखोरीची वेळ येईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. लाल्या रोगग्रस्त कापूस पिकाचा तातडीने पंचनामा, नुकसानभरपाईसाठी विशेष आर्थिक पॅकेज, कापूस दराला किमान ९ हजार रुपये हमीभाव, कृषी विभागाकडून रोगनियंत्रणाविषयी त्वरित मार्गदर्शन करण्याची अपेक्षा शेतकर्‍यांकडून होत आहे.