पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली आंजीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
वर्धा,
pankaj-bhoyar : आंजी येथे नव्याने मंजूर ग्रामीण रुग्णालच्या जागेवर अंतिम मोहोर लावण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जागेची पाहणी करीत बांधकामासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुमंत वाघ उपस्थित होते.
 
 
J
 
आंजी (मोठी) गावाच्या आजूबाजूला वर्धा, आर्वी व सेलू तालुयातील जवळपास ५० ते ६० गावं जोडली आहेत. ही गावं दुर्गम भागात असल्याने येथील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळताना अनेक अडीअडचणी येत होत्या. रात्री अपरात्री रुग्णांना उपचारासाठी नेताना अनेक अडचणी येत होत्या. वर्धेपर्यंत रुग्णांना नेताना अनेकदा मृत्यू दगावत होते. त्यामुळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी आंजी येथे ग्रामीण रुग्णालयायची मागणी केली होती. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आ. राजेश बकाणे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. आंजी येथे ३० खाटांचे रुग्णालय होणार असून त्यावर अंदाजे २६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. रुग्णालयसाठी जागेची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जागेची पाहणी करून पायाभूत सुविधा, इमारत बांधकाम, सोयी सुविधांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. गफाट यांच्या प्रयत्नामुळे लवकरच आंजी व परिसरातील गावांना आरोग्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.