अमरावती,
ravi-rana : विदर्भातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या चिखलदर्यात उभारल्या जात असलेल्या आशियातील तिसर्या क्रमांकाच्या भव्य स्कायवॉकच्या बांधकामाची पाहणी बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी शनिवारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला जात असलेला हा स्कायवॉक चिखलदराच्या निसर्गरम्य दरीचे अनोखे दर्शन घडवणार असून, भविष्यातील पर्यटनाचा नवा अध्याय ठरणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष सहकार्य, तसेच भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय स्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे स्कायवॉक प्रकल्पाला वेग आला आहे. पाहणीदरम्यान अधिकार्यांनी आमदार राणा यांना कामाच्या प्रगतीचा आढावा दिला. सध्या काम अंतिम टप्प्यात असून पुढील चार महिन्यांत स्कायवॉक पर्यटकांसाठी सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
स्कायवॉक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर चिखलदर्याचे सौंदर्य आणि पर्यटन क्षमता नव्या उंचीवर जाणार आहे. पर्यटकांसाठी सुरक्षित, रोमांचक आणि भव्य अनुभव देणार्या या स्कायवॉकमुळे चिखलदर्याचे वैभव अधिक उजळणार, असे आमदार रवी राणा यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. चिखलदर्यातील तरुणांसाठी पर्यटन क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास आमदार राणा यांनी व्यक्त केला.
स्कायवॉकच्या माध्यमातून चिखलदरा हे पर्यटन नकाशावरील अधिक सक्षम व आकर्षक ठिकाण बनणार असून, विदर्भाच्या निसर्ग पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी राजेंद्र सोमवंशी, आल्हाद कलोती, राजेश मांगलेकर, अनवर हुसेन, वेंदात सुरपाटणे, नीलेश कुलकर्णी, गुरु ठाकूर सोमवंशी आदी उपस्थित होते.