पाॅश हाॅटेलमध्ये तरुणींकडून बळजबरी देहव्यापार

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल : एका 21 वर्षीय तरुणीची सुटका

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
Somalwada Chowk hotel raid वर्धा राेडवरील साेमलवाडा चाैकातील नामांकित ‘द इम्पेरियल ग्रीन हाॅटेल’मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तरुणींकडून बळजबरी देहव्यापार करवून घेण्यात येत हाेता. येथे अनेक तरुणींना हाॅटेलमध्ये नेऊन देहव्यापाराच्या दलदलीत ढकलल्या जात हाेत हाेते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या संयुक्त पथकाने हाॅटेलममध्ये धाड टाकून सेक्स रॅकेटचा भंडााेड केला. पाेलिसांनी हाॅटेल संचालकाला अटक करून पीडित तरुणीला ताब्यात घेतले. राजेश उफर् अमित ताराचंद डाेंगरवार (50) रा. मनीषनगर असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. चाैकशीत राजेशने दाेन साथीदारांसाेबत मिळून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती दिली. राजा आणि काव्या अशी इतर आराेपींची नावे असून पाेलिस त्यांचा शाेध घेत आहेत.
 

Somalwada Chowk hotel raid  
 
 
वर्धा राेडवर साेमलवाडा Somalwada Chowk hotel raid चाैकातील ‘द इम्पेरियल ग्रीन हाॅटेल’मध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. या माहितीच्या आधारावर पाेलिसांनी हाॅटेलवर धाड टाकली. आराेपी राजेश हा स्वत:च्या आर्थिक ायद्यासाठी फरार आराेपींसाेबत मिळून ग्राहकांना जागा उपलब्ध करण्यासह पीडित मुलींना पैशांचे आमिष दाखवून देह व्यवसाय करून घेताना आढळला. देहव्यवसायात अडकलेल्या एका पीडितेची सुटका करून राजेशला अटक केली. पाेलिसांनी त्याच्याकडून राेख 8 हजार रुपये, माेबाईल ाेन, माेटारसायकल, डीव्हीआर असा एकूण 81,200 रुपयांचा माल जप्त केला. फरार आराेपींचा शाेध सुरू आहे.