पायलट नमांश स्याल यांचा शेवटचा व्हिडिओ आला समोर...हसताना दिसले

    दिनांक :22-Nov-2025
Total Views |
दुबई,
Video of Pilot Namansh Syal दुबई एअर शोमध्ये भारताच्या स्वदेशी तेजस लढाऊ विमानाच्या प्रदर्शानादरम्यान झालेल्या भीषण अपघातात भारतीय पायलटचा मृत्यू झाला आहे. शेवटच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेत पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांनी प्राण गमावले. शुक्रवारी दुपारी सुमारे २:१० वाजता अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर तेजसचे प्रात्यक्षिक उड्डाण सुरू असताना अचानक विमानाचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच ते वेगाने जमिनीवर आदळले. या अपघातापूर्वीचा पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
 

Wing Commander Naman Sayal 
या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे. तेजसशी संबंधित हा दुसरा गंभीर अपघात ठरला आहे. दरम्यान, अपघातापूर्वीचा विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये विंग कमांडर नमांश स्याल हे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, यूएईमधील भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (आखाती विभाग) असीम महाजन यांच्यासोबत संवाद साधताना दिसतात. त्यांच्या शांत चेहऱ्यावरचे हलकेसे हास्य आणि कर्तव्यनिष्ठ आत्मविश्वास अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. दुबईपूर्वी गुवाहाटी एअर शोमध्ये तेजसने उत्कृष्ट उड्डाणे सादर केली होती, ज्यामुळे या दुर्घटनेचे दुःख अधिकच चटका लावणारे बनले आहे.
 
 

नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील पटियालकर येथील रहिवासी होते. निवृत्त प्राचार्य गगन कुमार यांचे ते पुत्र असून त्यांची आई वीणा देवी आणि एक बहीण आहे. नमन यांच्या पत्नी अफसान या देखील भारतीय हवाई दलातील पायलट असून, दोघांचे लग्न १६ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांच्या ७ वर्षांच्या मुलीवरही या दुःखाचा मोठा आघात झाला आहे.