शहर बस चालक वाहकांचे उद्या बेमुदत काम बंद आंदोलन

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
नागपूर,
indefinite-work-stoppage-movement : नागपूर महानगरपालिका परिवहन सेवेत कार्यरत असलेल्या सर्व बस चालक आणि वाहकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी सोमवार, २४ नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार व वाहतूक सेलच्या वतीने आंदोलन केल्या जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार व वाहतूक सेलचे अध्यक्ष राकेश घोसेकर, विवेक वानखेड़े, शिवकर आदींनी दिली आहे. मुख्यत: या आंदोलनामुळे शहर बस वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.
 
 
 

BUS