सेनुरन मुथुसामीची शतकी कमाल; असा विक्रम करणारे तिसरेच फलंदाज

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
गुवाहाटी,
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टार अष्टपैलू सेनुरन मुथुस्वामीने आफ्रिकन संघासाठी शानदार शतक झळकावले, जे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिलेच शतक होते. या शतकासह मुथुस्वामीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला.
 

sa
 
 
 
सेनुरन मुथुस्वामी कसोटी क्रिकेटमध्ये ७ व्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना भारताविरुद्ध शतक झळकावणारा तिसरा दक्षिण आफ्रिकन फलंदाज ठरला. याआधीचा विक्रम २०१९ मध्ये क्विंटन डी कॉकने १११ धावा करून केला होता. लान्स क्लुसनरने १९९७ मध्ये केपटाऊनमध्ये त्या सामन्यात नाबाद १०२ धावा करून ही कामगिरी केली. आता, मुथुस्वामीने २०२५ मध्ये गुवाहाटी येथे ही कामगिरी केली आहे.
सेनुरन मुथुस्वामी हा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात ५०+ धावांचा टप्पा गाठणारा चौथा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला. त्याच्या आधी ग्रॅम स्मिथ, मार्क बाउचर आणि टेम्बा बावुमा यांनी ही कामगिरी केली होती. मुथुस्वामीचे नाव आता दिग्गजांच्या यादीत जोडले गेले आहे. ७ व्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी भारताविरुद्ध कसोटी सामन्यात ५०+ धावांचा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेनुरन मुथुस्वामी व्यतिरिक्त, मार्को जॅन्सेननेही या डावात ५०+ धावांचा टप्पा गाठला आहे.
कसोटी सामना: दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत दक्षिण आफ्रिकेने ७ गडी गमावून ४२८ धावा केल्या आहेत. मुथुस्वामीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि २०३ चेंडूत १०७ धावा करत नाबाद राहिला. मार्को जॅनसेननेही शानदार अर्धशतक झळकावले आणि तो ५१ धावांवर खेळत आहे. या दोन्ही फलंदाजांनी आठव्या विकेटसाठी ९४ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. कुलदीप यादवने आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने दोन विकेट घेतल्या आहेत, तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.