बुलढाणा,
s-m-kanadje : लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान बुलढाणाच्याा वतीने साहित्य संमेलन सर्वांच्या सहकार्यातून आणि प्रयत्नाने यशस्वी होईलच, शिवाय साहित्यीक लौकिकात भरच घालेल असे मत प्रा डॉ एस एम कानडजे यांनी प्रगती वाचनालयात झालेल्या वामनदादा कर्डक साहित्य संमेलन आयोजन बैठकीत मांडले. यावेळी बैठकीस शेतकरी नेते रविकांत तुपकर,प्रतिष्ठानचे पदाधिकारी शाहीर डी आर इंगळे, सुरेश साबळे रविंद्र साळवे, पंजाबराव गायकवाड,शाहिना पठाण प्रा विजयालक्ष्मी वानखेडे डॉ विजया काकडे, के ओ बावस्कर, शिवाजी गवई उपस्थित होते.
वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचे आयोजन बैठक येथील प्रगती वाचनालयात दि. २२ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे सचिव सुरेश साबळे यांनी आगामी घेण्यात येत असलेल्या साहित्य संमेलनाबाबत संक्षिप्त माहिती प्रास्ताविकातून दिली.
उपस्थित असलेल्यांपैकी प्रा रवींद्र साळवे, पंजाबराव गायकवाड, शाहिना पठाण, विजयालक्ष्मी वानखेडे, शाहीर डी आर इंगळे, शिवाजी गवई, के ओ बावस्कर, अनिता कापरे, , शिवाजी गवई, रवींद्र झिने, रविकिरण वानखेडे डॉ मंजु राजे जाधव इ.नी साहित्य संमेलन आयोजनाबाबत आपली मतं व्यक्त केली. रविकांत तुपकर यांनी स्वागतअध्यक्ष पदाचा सन्मान स्वीकारत असल्याचे सांगत साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीस आत्माराम चौतमोल, के व्ही प्रधान, विलास सपकाळ, प्रा डॉ ढाले, गणेश झोटे, पी आर इंगळे, उत्तम बाजड, गणेश आंभोरे, सरला इंगळे, कार्तिक सवडतकर इत्यादीसह शहर आणि परिसरातील साहित्यिक, साहित्य रसिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.