नागपूर,
devendra-fadnavis : राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील संबंध कमालीचे बिघडल्याचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र प्रत्यक्षात तशी कुठलीही परिस्थिती नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र यांनी दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणताही दुरावा नसताना आम्ही एकमेकांशी न बोलण्यासारखे काहीही घडलेले नाही, हा पूर्णत: वेड्यांचा बाजार सुरु असून यामध्ये काही माध्यमे सुध्दा वेडी झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाच्या वतीने रेशिमबागेत आयोजित ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी होते.
एका कार्यक्रमासाठी हुतात्मा स्मारक येथे आम्ही भेटलो. एकनाथ शिंदे यांनी ते कुठे जातायत हे त्यांनी सांगितले आणि मी कुठे जातोय हे त्यांना मी सांगितले. त्यातून काही गोष्टी क्लिक करुन बोललो नाही, असे माध्यमावर दाखवले गेले. शनिवारच्या कार्यक्रमात आमच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याचे ठरले होते. तिथे आल्यावर, स्टेजवर आणि जातानाही भेटलो. कारण न बोलण्यासारखे काहीही घडलेले नाही. विविध माध्यमावर तुम्ही दाखवताय तशी कुठलीही परिस्थिती नाही. जे लोक असे दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.