उद्या निघणार एकता मार्च

-6 जिल्ह्यातील 400 तरुण सहभागी

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
unity-march : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त, भारत सरकारचे युवा कल्याण मंत्रालयाने देशात चार एकता मार्च आयोजित केले असून त्यापैकी एक नागपुरातील घाट रोडवरील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळापासून 24 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
 
 
 
23-nov-55
 
 
 
आनंद टॉकीज भुयारी रस्ता, लोखंडी पूल, बर्डी मेन रोड, व्हेरायटी चौक, संविधान चौक, लिबर्टी चौक, छावणी, मनोरुग्णालय, मानकापूर, कोराडी, सावनेर, पांढुर्णा, मुलताई, बैतुल, हरदामार्गे बसने इंदूर मार्गे गुजरातमधील आणंद शहरापर्यंत जाईल. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या नेतृत्वाखाली चालत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे पोहोचेल. ओरिसा, तेलंगणा, पाँडिचेरी, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन असे 409 तरुण नागपूरच्या मार्चमध्ये सहभागी झाले आहेत.
 
 
नागपूरमधील सर्व मित्र मोटारसायकलवरून शहराच्या हद्दीपर्यंत रॅलीसोबत राहतील. या रॅलीमध्ये सहभागी होणारे 300 बाईकर्स सावनेरपर्यंत या रॅलीसह निघतील. या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे रॅलीसमोर एका खुल्या जीपमध्ये 50 बुलेट रायडर्स असतील. वल्लभभाई पटेल यांचे एक कटआऊट राहील.
 
 
सावनेरपर्यंत नेण्याची जबाबदारी दयाशंकर तिवारी, श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संदीप जाधव, मनीषा धावडे, विष्णू चांगदे, बाल्या बोरकर, शिवानी दाणी व सर्व युवा कार्यकर्त्यांवर राहील. ही रॅली राजकीय नाही. राजकीय घोषणाबाजी केली जाणार नाही, बॅनर लावले जाणार नाहीत.
 
 
या रॅलीवर फुलांचा वर्षाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
मशाल रॅली 
 
 
या रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेल्या ओरिसा, तेलंगणा, पाँडिचेरी, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन असे 409 तरुणांनी दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील चितार ओळी गांधी पुतळा चौकातून इतवारी शहीद चौकमार्गे गांधीबाग उद्यानापर्यंत मशाल रॅली काढली. तेथे सांस्कृतिक कार्यक्रम व कवयित्री श्रद्धा शौर्य यांचे काव्यवाचन झाले.