अवैध मुरूम उत्खननावर पोलिसांची कारवाई

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
लाखांदूर,
illegal-murum-mining : तालुक्यातील पाचगाव टोली परिसरात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर पालांदूर पोलिस स्टेशनच्या पथकाने शनिवारी रात्री 1.30 ते 2.45 दरम्यान करण्यात आली. यावेळी 57 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
 
LK
 
 
 
तपासादरम्यान संबंधितांकडून विनापरवाना मुरूम उत्खनन सुरू असल्याचे उघड झाले. महसूल विभागाच्या उपस्थितीत पंचनामा करून सहाचाकी ट्रक, दहाचाकी टिपर व जेसीबी मशीन असा एकूण 57 लाख 50 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. फिर्यादी पोलिस नाईक पुंडलिक रोशन सिंगनजुडे (35) यांच्या तक्रारीवरून चार आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 379 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8) खनिज आणि खाणी अधिनियम कलम 4, 21 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.