चंद्रपूर,
raid-on-spa-center-in-brahmapuri स्पा सेंटरच्या आड आसाम राज्यातील महिलांकडून देह विक्रीचा व्यापार करवून घेणार्या ब्रम्हपुरी येथील शेषनगर परिसरातील माय हेल्थ प्रो स्पा अॅण्ड वेलनेस सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून मिझोरम व नागालँड येथील तीन पिडीत महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी या सेंटरचा व्यवसाय व्यवस्थापक करण गंगाधर मोहजनकर (24, रा. पांजरेपार, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) यास ताब्यात घेण्यात आले असून,मालक प्रितीश बुर्ले (रा. ब्रम्हपुरी) हा फरार आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याच्या वतीने संयुक्तरित्या शनिवारी करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 22 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्हात गस्तीवर असताना ब्रम्हपुरी येथील माय हेल्थ प्रो स्पा वेलनेस सेंटर येथे आसामी महिलांकडुन वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार विशेष पोलिस अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलिस कर्मचारी, बनावट गिर्हाईक, समाजसेविका, महिला पंच यांच्या उपस्थितीत धाड टाकली. raid-on-spa-center-in-brahmapuri या कारवाइर्त मिझोरम व नागालँड येथील तीन पिडीत महिलाची सुटका करण्यात आली. माय हेल्थ प्रोस्पा अॅण्ड वेलनेस सेंटरचा व्यवसाय व्यवस्थापक करण मोहजनकर यास ताब्यात घेण्यात आले असून, स्पा सेंटरचा मालक प्रितीश बुर्ले (रा. ब्रम्हपुरी) हा फरार आहे. पोलिसांनी पंचनामा करून रोख रक्कम, भ्रमणध्वनी , रजिस्टर, पावती बुक, स्कॅनर, कंडोम पाकीट असा एकूण 18 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरूध्द ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनीयम 1956 कलम 3. 4, 5, 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाख चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले, सहायक पोलिस निरीक्षक शितल खोब्रागडे, पोलिस उप निरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, हवालदार जयंत चुनारकर, नितेश महात्मे, छाया निकोडे, निराशा तितरे, अपर्णा मानकर आदींसह समाजसेविका सरिता मालु, माया मेश्राम, हर्षा वानोडे यांनी केली.