वर्धा,
wardha-zilla-parishad-elections : सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे रोजीच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी आरक्षण ५० टके अधिक होऊ नये असे निर्देश दिले होते. राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये ५० टके आरक्षण आहे. मात्र, वर्धा जिल्हा परिषदेत ५२ पैकी २६ ऐवजी २८ जागा राखीव आहेत. त्यामुळे वर्धा जिल्हा परिषद निवडणुका धोयात येऊ शकतात. २५ नोव्हेंबर रोजी या संदर्भातील याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयात होणार्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका मार्च २०२२ पासून प्रलंबित आहेत. निवडणुकांना विलंब होत असल्यामुळे प्रशासकांची नियुती करण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुका होण्याची अपेक्षा होती. मात्र, ओबीसी आरक्षणासह इतर अनेक प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या ६ मे रोजीच्या अंतिम निर्णयात ओबीसींसाठी २७ टके, एससींसाठी १३ टके आणि एसटीसाठी ७.५ टके आरक्षणाची तरतूद करण्यात आली. त्यामुळे एकूण टकेवारी ५० टयांपेक्षा जास्त होणार नाही असा निर्णय देण्यात आला. निवडणुका एका महिन्याच्या आत जाहीर करण्यात आल्या आणि त्या चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेशही आहेत.
निवडणूक प्रक्रियेतील विलंबामुळे ३१ जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. राज्यातील नगरपरिषदा आणि अनेक जिल्हा परिषदांमध्ये ५० टयांपेक्षा जास्त आरक्षण दिले गेले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असल्याने २६ जागा राखीव ठेवणे आवश्यक होते. जिल्हा परिषदेत एससी आणि एसटीसाठी प्रत्येकी ७ तर ओबीसींसाठी १४ जागा राखीव ठेवल्याने जिपच्या निवडणुका धोयात येऊ शकतात. या प्रकरणातील सुनावणी बुधवार २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव सर्कल
वर्धा जिल्हा परिषदेत अनुसूचित जातींसाठी सात सर्कल राखीव आहेत. यामध्ये गौळ, गुंजखेडा, नालवाडी अनुसूचित जाती पुरुषांसाठी आणि सावंगी, सिंदी मेघे, नाचणगाव आणि वाठोडा अनुसूचित जमाती महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमाती पुरुषांसाठी कोरा, झडशी आणि विरुळ राखीव आहेत तर मोरंगणा, साहूर, रोहणा आणि सिंदी विहिरी अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहेत.
ओबीसी राखीव सर्कल
ओबीसी प्रवर्गासाठी १४ सर्कल राखीव आहेत. यामध्ये वायफड, आंजी मोठी, सेवाग्राम, वायगाव निपाणी, कांढळी, येळाकेळी आणि हमदापूर पुरुषांसाठी तर घोराड, पवनार, बोरगाव मेघे, भिडी, इंझाळा, नंदोरी आणि वरुड सर्कलचा समावेश आहे.