साहित्याच्या कुंभमेळ्याची रात्र झाली सुफियाना

- साधाे बँडच्या सादरीकरणाने आणली रंगत - नागपुरात राष्ट्रीय पुस्तक महाेत्सवाला प्रारंभ

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
national-book-festival : राज्याच्या उपराजधानीत शनिवारपासून राष्ट्रीय पुस्तक महाेत्सवाच्या रुपाने राहित्याचा महाकुंभ सुरू आहे. नागपूरकर या महाकुंभात न्हाऊन निघत असतानाच रविवारी साधाे बँडच्या कलाकारांनी सायंकाळी कलाप्रेमींची रात्र सुफियाना केली. मनाला भिडणारी गाणी ऐकून रसिकही तृप्त झाले.
 
 
 
SADHO
 
 
 
नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडियाच्‍यावतीने व महाराष्ट्र शासन आणि झिराे माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात प्रथमच नऊ दिवसीय नागपूर पुस्तक महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. यांतर्गत‘झिराे माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चा शानदार शुभारंभ रविवारी झाला. या महाेत्सवात साहित्यसह विविध कलांची मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे. त्याचा आरंभ आज साधाे बँडच्या सादरीकरणाने झाला. या युवा गायकांनी तरुणाईच्या दिलाला साद घालणारी काही सूी प्रकारातील गाणी अतिशय सुरेखपणे सादर केली. इसमे जाना की तारीफ नहीं या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात हाेताच उपस्थितांना एकच जल्लाेष केला. यानंतर सादर झालेल्या प्रीत की लत माेहे ऐसी लागी, इश्क की साजिशे इश्क की बाजिया, मेरा इश्क सूफियाना, मैं भी नाचू मनाऊ साेनेया, मितवा कहे धडकने तुझसे क्या यासह एकाहून एक गाणी सादर केली. उत्तराेत्तर हा कार्यक्रम रंगत गेला आणि माहाेलही सुफियाना हाेत गेला. कार्यक्रमाला नागपूरकरांनी भरभरून दिली दिली.