एकाच परिवारात तीन दिवसात तीन मृत्यू

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
सेलू, 
death-in-the-family : येथील एकाच कुटुंबात तीन दिवसात आई, मुलगा अन् सासूचा मृत्यू झाला. वॉर्ड ४ मधील डुकरे परिवारासोबत नियतीने केलेला हा क्रूर खेळ मनाला चटका लावून गेला.
 
 
J K
 
 
 
तुषार अरुण डुकरे (३१) हा बर्‍याच दिवसांपासून आजारी होता. त्याचा १८ रोजी उपचारादरम्यान सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. ही घटना तुषारच्या आजी अंजना डुकरे (८५) यांना कळाली. नातवाच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने दुसर्‍या दिवशी १९ रोजी त्यांनीही श्वास सोडला. आजारी मुलगा गेल्याच्या दुःखात असलेल्या माला डुकरे (६१) यांचेही २० नोव्हेंबरला रात्री निधन झाले. तुषारचा अन्त्यसंस्कार सेलूला झाला. त्याच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करून नातेवाईक घरी पोहोचले तर दुसर्‍या दिवशी आजीचे निधन झाल्याने नातेवाईकांना नागपूरला जावे लागले. तो अन्त्यसंस्कार आटोपून घरी पोहोचल्यावर पुन्हा तुषारची आर्ई मरण पावल्याचा निरोप धडकला. त्यामुळे नातेवाईकांना शुक्रवारी पुन्हा सेलूला यावे लागले.