नागपूर,
ila-arun : स्मरणरंजन, कल्पनारंजन, फ्लॅशबॅक आणि फ्लॅशफॉरवर्डचे अनोखे संगम आणि अनेक अविस्मरणीय आठवणींना उजाळा देणाऱ्या 'परदे के पीछे' या आत्मकथा पुस्तकाचे ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिवल (ओसीएलएफ) येथे प्रदर्शित केली जात आहे. भारतीय अभिनेत्री, टीव्ही व्यक्तिमत्व राजस्थानी लोक-पॉप गायिका आणि बहुआयामी कलावंत इला अरुण यांची आत्मकथा अंजुला बेदी यांनी इंग्रजी भाषेत सहलेखिका म्हणून शब्दांतरित केली आहे.
यावेळी ओसीएलएफ येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी "परदे के पीछे: इला अरुणच्या चरित्रामागील न उलगळलेला प्रवास यावर एक हृदयस्पर्शी संवाद" या विषयावर आयोजित एका खास चर्चासत्रात लेखिका, पत्रकार आणि ओम पुरी फाउंडेशनच्या अध्यक्षा नंदिता पुरी आणि पुरस्कार विजेता नाट्य कलाकार, पॉप गायिका पद्मश्री शेरोन प्रभाकर यांनी इला अरुण यांची मुलाखत घेतली. आपल्या या आत्मकथेबद्दल बोलताना, “माझे आयुष्य पुस्तकात मांडावे असे मला कधी वाटले नव्हते; पण लेखन सुरू केले आणि आठवणींचा पूर सुरू झाला,” असे इला अरुण सांगतात.
बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आपल्या जन्म तारखेबद्दल झालेल्या गोंधळ बद्दलचा किस्सा सांगताना, 'जगासाठी जरी माझी जन्मतारीख १५ मार्च असली तरी माझ्या आईने सांगितल्या प्रमाणे माझ्यासाठी माझी जन्मतारीख ही १८ फेब्रुवारी आहे.' असे त्या म्हणाल्या. असे अनेक किस्से त्यांच्या या आत्मकथेत लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. राजस्थानी लोकसंगीत, ‘चोली के पीछे’ सारखी लोकप्रिय गाणी, जोधा अकबरसारख्या चित्रपटांतील भूमिका, तसेच हेन्रीक इब्सेनच्या नाटकांचे हिंदी रूपांतर अशा अनेक कलाक्षेत्रात काम करूनही इला अरुण यांची लेखनाशी नाळ कायमची जुळलेलीच होती. कोरोनाच्या काळात दोन वर्षांमध्ये लिहिलेली ही आत्मकथा त्यांच्या ४२ वर्षांच्या नाट्यप्रवासाची आणि ३० वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील अनुभवांची समृद्ध कहाणी मांडते.