रब्बीसाठी २२ हजार ५३९ विंटल बियाणांचा पुरवठा

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
Supply of seeds for Rabi : खरीप हंगामात मोठ्या नुकसानीनंतर जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी पिकांच्या तयारीला लागले आहे. यावर्षी जिल्ह्यात १.१४ लाख हेटर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यासाठी बियाणे आणि खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर कृषी विभागाचे लक्ष आहे.
 
 

KM
 
 
 
गेल्या काही दिवसांपासून रबी पिकांची पेरण्यांना शेतकर्‍यांकडून गती दिली असून सुमारे २५ हजार हेटर क्षेत्रात पेरणी पूर्णही झाली आहे. यावर्षी रब्बीसाठी ४१ हजार ६२० विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी २२ हजार ५३९.२ विंटल बियाणांचा पुरवठा जिल्ह्याला झाला असून ९ हजार ९४७ विंटल बियाणांची आतापर्यंत विक्री झाली आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात ४.५ लाख हेटर क्षेत्रात कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांची लागवड झाली. अतिवृष्टी, रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांना फटका बसत शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनेही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदत जाहीर केली आहे. काहींच्या बँक खात्यात मदतीची रकम जमा झाली तर अनेकांना अजूनही शासकीय मदतीची प्रतीक्षाच आहे. अशा परिस्थितीत पैशांची जुळवाजुळव करून बियाणे, खताचीं खरेदी करून सिंचनाची सोय असलेले शेतकरी रब्बीच्या पेरणीला लागले आहेत. महागडे खत व बियाणे यामुळे शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंडही द्यावे लागत आहे.
 
 
जिल्ह्याला मागणीच्या तुलनेत २२ हजार ५३९.२ विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. ज्यात महाबीजकडून ४ हजार ६५७.२ विंटल आणि खाजगी कंपन्यांकडून १७ हजार ८८२ विंटल बियाण्यांचा समावेश आहे. यापैकी महाबीजचे २ हजार ७४८ विंटल आणि खाजगी कंपन्यांचे ७ हजार १९९ विंटल असे ९ हजार ९४७ विंटल बियाण्यांची विक्री आतापर्यंत झाली आहे.
 
 
हरभराचे क्षेत्र वाढणार?
 
 
रब्बी हंगामात ७२ हजार १०२ हेटरवर हरभर्‍याची लागवड होण्याची शयता आहे. यासाठी २६ हजार ४५९ विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली होती. महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून ९ हजार १२५ विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला असून त्यापैकी ६ हजार ४७० विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. यंदा हरभरा पिकांची लागवड क्षेत्र वाढण्याची शयता व्यत केली जात आहे.