विश्वमांगल्य सभेची नुतन कार्यकारणी घोषित

चारुलता एकघरे यांची शाखेच्या अध्यक्ष म्हणून निवड

    दिनांक :23-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड,
vishmangalya sabha, नुकतीच रहाटगाव ( अमरावती) येथे विश्वमांगल्य सभेची विदर्भ प्रांत बैठक संपन्न झाली. त्यामध्ये कारंजा शाखेच्या अध्यक्ष म्हणून चारुलता अतुल एकघरे यांची निवड झाली. तसेच सह संघटक म्हणुन ज्योत्स्ना राखोंडे व वाशीम जिल्हा संघटक म्हणून मनीषा गिरीश जोशी यांची निवड झाली.
 
 
vishmangalya sabha,
विश्वमांगल्य सभेच्या कारंजा शाखेचे कार्य गेल्या १४ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. जुन्या कार्यकारणीमध्ये काही नवीन दायित्व देऊन नव्याने संपूर्ण कार्यकारिणी चारुताई एकघरे यांनी बैठकीत घोषित केली. त्यामध्ये उपाध्यक्ष वैशाली नंदे, संघटक पियुशा भोयर, सचिव श्रद्धा रगडे, सह सचिव निशा गाढवे, सदाचार सभा संयोजिका पल्लवी अनसिंगकर, सह सभा संयोजिका शितल काकडे, कोषाध्यक्ष जानकी देशपांडे, सह कोषाध्यक्ष गायत्री पापडे, कार्यालय प्रमुख शिवानी देशपांडे, सह कार्यालय प्रमुख वीणा दिग्रसकर, बाल सभा संयोजिका सोनाली पायल, सह बालसभा संयोजिका नम्रता भोपाळे, मीडिया प्रमुख मोना देशपांडे, प्रशिक्षण प्रमुख सुप्रिया देशमुख तसेच कार्यकारणी सदस्य स्मिता धनस्कर यांना दायित्व दिल्या गेले. सदाचार सभा ही विश्वमांगल्य सभेची नित्य कार्यपद्धती आहे.
या सभांमधील संयोजिकांची नावेही घोषित करण्यात आली. रेणुका सदाचार सभेच्या संयोजिका अनघा देशपांडे, सह संयोजिका माधुरी शेंडोकार, आदीशक्ती सदाचार सभा संयोजिका सुनंदा गायकवाड, निशा देशमुख, आशीर्वाद गणेश सदाचार सभेच्या संयोजिका सीमा मुगल, सह संयोजिका संगीता मेहेर, शिवशक्ती सदाचार सभेच्या संयोजिका सोनल पापडे, सपना चौधरी, गमाई सदाचार सभेच्या संयोजिका प्रतीक्षा देसाई, माऊली सदाचार सभेच्या संयोजिका नमिता पांडे, तसेच सह संयोजिका सुरेखा दंडवते, कामाक्षा माता सदाचार सभा संयोजिका नयन खानजोडे व सह मेघा गुल्हाने, एकविरा सदाचार सभेच्या संयोजिका दीपा पायल, सह संयोजिका अर्चना अरुढकार, अंजनी माता सदाचार सभा संयोजिका एकता गायकवाड यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळेस उपस्थित असलेल्या धर्म संस्कृती शिक्षा विभागाच्या अ. भा. प्रचार प्रसार प्रमुख व वाशीम जिल्हा विस्तारिका अंजली कोडापे तसेच वाशीम जिल्ह्याच्या सदाचार सभा संयोजका वृषाली लक्रस आणि कारंजा शाखेच्या कार्यालय व्यवस्थापक शैलाताई देशपांडे यांनी घोषित झालेल्या सर्व कार्यकारणीचे अभिनंदन केले. अंजली कोडापे यांनी यावेळी विश्वमांगल्य सभेच्या पुढे होणार्‍या विदर्भ प्रांत अधिवेशनाची रूपरेषा स्पष्ट केली.
छायाचित्र - लोगो