येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या सेटवर शिरला बिबट्या!

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
पुणे,
A leopard entered the set of the series महाराष्ट्रात वाढती बिबट्यांची दहशत आता लोकप्रिय मालिकेतही दिसणार आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत राया-मंजिरीच्या आयुष्यात नवीन संकटाची एन्ट्री झाली आहे. मालिकेत सध्या राया आणि मंजिरीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र ऐन मेंदी समारंभाच्या काळात बिबट्याच्या हल्यामुळे गावात दहशत पसरते आणि दोघांना या संकटाचा धैर्याने सामना करावा लागतो.
 
A leopard entered the set of the series
 
स्टार प्रवाहवरील या मालिकेत बिबट्यांच्या हल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि सावधगिरीचे संदेश देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातील. विशाल म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये बिबट्यांच्या हल्यांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. मालिकेतही ही दहशत प्रेक्षकांना अनुभवता येईल. त्यांनी सांगितले की, बिबट्यांचा दिसल्यास वनविभागाला त्वरित कळवावे, एकट्याने बाहेर जाणे टाळावे, घरातील प्रवेशद्वार आणि रस्ते पुरेशा प्रकाशात ठेवावेत आणि लहान मुलांना एकटे सोडू नये.
मंजिरी भूमिका साकारणारी पूजा बिरारी म्हणाली की, बिबट्यांचे हल्ले, त्यामागील कारणे आणि बचावासाठीचे उपाय यावर भाष्य करणे संवेदनशील पाऊल आहे. मानवी वस्तीतील बिबट्यांचा वावर भीतीचे वातावरण निर्माण करतो. मालिकेत परिस्थितीचं गांभीर्य राखून प्रेक्षकांपर्यंत भयाची खरी प्रतिमा पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत हा प्रसंग रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.