नागरिकांनी तक्रार करताच अति.आयुक्त थेट उद्यानात

- संवाद साधून ऐकून घेतल्या समस्या

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-news दत्तात्रयनगरातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील समस्या सामान्य नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त डाॅ.अभिजीत चाैधरी यांच्याकडे मांडल्या.त्यांच्याकडे तक्रारी आणि समस्या मांडताच दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. या थेट उद्यानात पाेहचल्या. त्यांनी उद्यानातील नागरिकांशी चर्चा केली आणि समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर लगेच समस्यांवर ताेडगा काढत कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिकांनी डाॅ. चाैधरींचे आभार व्यक्त केले.
 
 
nagpur-news
 
दत्तात्रयनगरातील संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीने अध्यक्ष डाॅ. बबनराव गांजरे यांच्या नेतृत्वात 50 नागरिकांचे शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त डाॅ. अभिजीत चाैधरी यांची भेट घेतली. उद्यानात नियमित येणाèया 600 नागरिकांच्या स्वाक्षरींचे 11 प्रमुख मागण्याचे निवेदन दिले. तसेच उद्यानात दैनंदिन उद्भवणाèया समस्यांची विस्तृत माहिती कृती समितीने आयुक्तांना दिली. उद्यानातील प्रमुख मागण्यांमध्ये िफरण्याचा ट्रॅकची रुंदी आणि उंची वाढवणे, ग्रीन जिम व लहान मुलांची खेळणी बसविणे, ज्येष्ठांसाठी उद्यानात बेंचेस लावणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. आयुक्तांनी या मागण्याचा सकारात्मक विचार करीत अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांना प्रत्यक्षात पाहणी करण्याचे आदेश दिले. शनिवारी सकाळी आठ वाजता त्यांनी उद्यानाचा दाैरा केला. त्यांनी संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीने अध्यक्ष डाॅ. बबनराव गांजरे, पांडुरंग वाकडे पाटील, उपाध्यक्ष मनाेहर महाकाळकर, महेंद्र शिरसागर, महादेव ताेंडरे, विनाेद लुटे, निशिकांत मामीडवार, त्र्यंबक महाकुलकर, नागेश जैन, हिम्मतराव आगाशे, नरेश गौरकर, आशिष सिरसाट, यांच्याशी चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या. त्यांनी वाॅकिंग ट्रॅकची प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच ग्रीन जिमसाठी जागा बघितली आणि मुलांची खेळणी लावण्यासंदर्भात निर्णय घेऊन नागरिकांच्या समस्यांवर ताेडगा काढला. nagpur-news येत्या 15 दिवसांत प्रत्यक्षात काम सुरु करण्याची तजविज करण्यात आली आहे. लक्ष्मण बालपांडे,देवाजी ठाकरे,तानाजी कडवे,प्रमाेद इंगळे, भागवतराव वऱ्हाडे, रामकृष्ण नागपुरे ,रमेश काकडे,महादेव ताेंडरे, अ‍ॅड. अनिल कांबळे, दामाेदर चांगाेले, माधवराव वऱ्हाडे, माजी डीसीपी परमानंद पराते, भारत ठाकरे, जय रामटेके, अरविंद भजभुजे, भगवान गजभिये, गणाेरकर, मुकुंदराव खाेंडे, रामेश्वर लिखार हे यावेळी उद्यानात उपस्थित हाेते.