अनिल कांबळे
नागपूर,
Banyan tree shifted to Gorewada पाचपावलीतील ठक्करग्राम परीसरात प्रस्तावित ई-लायब्ररीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महानगर पालिकेने 188 वर्षे जुन्या वडाच्या झाडाचे गाेरेवाड्यात यशस्वीरीत्या स्थानांतरित केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वडाचे झाड स्थानांतरित करण्यासाठी विविध अटींसह परवानगी दिली हाेती. ठक्करग्राम, पाचपावली येथील ई-लायब्ररीच्या परिसरातील बांधकामास 188 वर्षीय वटवृक्ष अडथळा निर्माण झाला हाेता. त्यामुळे वृक्ष स्थानांतरित करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला हाेता. या प्रकरणावर पाच ते सहा वेळा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने महापालिकेला सशर्थ परवानगी दिली हाेती. ताे वटवृक्ष स्थलांतरित केल्यानंतर जगायला हवा.
ताे वृक्ष न जगल्यास महापालिकेच्या सक्षम, जबाबदार अधिकाèयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका उच्च न्यायालयाने घेतली. वटवृक्ष स्थलांतरित केल्यानंतर त्या वृक्षाची पाच वर्षे देखभाल महापालिकेने याेग्यरित्या करावी. दर आठवड्यात त्या वटवृक्षाचा व्हिडिओ काढावा. त्या झाडाची जगण्याच्या दृष्टीने निगा राखावी. त्या बदल्यात अतिरिक्त झाडे लावा, अशा अटी उच्च न्यायालयाने मांडल्या हाेत्या. त्यानंतरच हा वटवृक्ष ठक्करग्राममधून गाेरेवाड्यात हलविण्यात आला.
अशी करावी लागली तारेवरची कसरत
स्थानांतरित करताना वडाच्या झाडांच्या विस्तृत मुळांमुळे आव्हान निर्माण झाले. कामगारांनी झाडाभाेवती चर खाेदले, काही मुळे वेगळी केली आणि ती सैल करण्यासाठी हायड्राॅलिक लिफफ्टर तसेच तीन जेसीबी यंत्रांचा वापर केला. एकदा झाडाच्या मुळांना गाेणपाट आणि अन्य रासायनिक प्रक्रिया वापरुन मूळांची निगा राखण्यात आली. वडाचे झाड 42 ूट उंच असून त्याची बुंध्याचा परिघ 34 ूट आहे. झाड उचलून ट्रेलरवर ठेवण्यात आले आणि गाेरेवाडा येथील जैवविविधता उद्यानात नेत नवीन खड्ड्यात राेवण्यात आले. खड्डा अर्धा भरून त्यात शेणखत, काळी माती, मुळं वाढवणारी औषधे व इतर सेंद्रिय पदार्थ टाकण्यात आले. झाड सरळ स्थितीत ठेवून त्याभाेवतीच्या मातीचे थर लावले आणि पाणी देण्यात आले.