वर्धेतील घन कचर्‍यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे अदानीला पत्र

पालकमंत्री भोयर यांची माहिती

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
cm fadnavis वर्धा व लगतच्या ग्रापं क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सीएसआर निधीतून हाती घेण्यासाठी अदाणी समूहाने सहकार्य करावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदाणी फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. प्रीती अदाणी यांना दिले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळवण्यात आले आहे.
 

देवेंद्र फडणवीस  
 
 
वाढती लोकसंख्या, पर्यावरणीय स्वच्छता राखण्यात प्रशासनाला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, घनकचर्‍याचे व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होतात. शहर आणि लगतच्या गावांचा कायापालट करण्यासाठी ‘स्वच्छ वर्धा, सुंदर वर्धा’ हा उपक्रम हाती घेतला आहे.cm fadnavis सामाजिकदृष्ट्या संस्थांकडून सीएसआर निधीद्वारे मदतीची अपेक्षा आहे. या उदात्त प्रयत्नात आपला सहभाग असावा, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. प्रीती अदाणी यांना केली आहे. सदर प्रकल्पावर अधिक चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याशी संपर्क करण्याची विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अदाणी समूहाला केली आहे.
शहर व परिसर स्वच्छ व सुंदर व्हावा : ना. भोयर
वर्धा शहर व लगतच्या परिसरात घनकचरा समस्या मोठी आहे. घनकचर्‍याचे नियोजन करताना अनेक अडचणी येतात. नप व ग्रापंवर घनकचरा व्यवस्थापन करताना प्रचंड आर्थिक भूर्दंड पडतो. शिवाय मनुष्यबळाची देखील कमतरता असते. त्यामुळे अदाणी समूहाच्या माध्यमातून शहर व लगतच्या ग्रापं क्षेत्रातील घनकचर्‍याचे व्यवस्थपन व्हावे व शहर तसेच लगतचा परिसर स्वच्छ व सुंदर व्हावा, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. याच प्रयत्नामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून अदाणी फांऊडेशनला सीएसआर निधीतून हा प्रकल्प राबविण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती ना. डॉ. पंकज भोयर यांनी दिली.