वर्धा,
drunk driving case Wardha वाहतूक पोलिसांची आर्वी नाका चौकात नाकाबंदी केली असता विना नंबरची दुचाकी घेऊन युवक आला. तो झिकझ्याक पद्धतीने गाडी चालवत असल्याने त्याला अडवण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याच्या वाहनांचे कागदपत्रं नव्हते शिवाय तो दारू पिऊन वाहन चालवत असल्याने सतीश निकाडे (२६) धंतोली चौक वर्धा याच्यावर आज २४ रोजी दुपारी आर्वीनाका परिसरात कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, drunk driving case Wardha आर्वीनाका परिसरात नाका बंदी करून तपासणी सुरू असताना दुचाकी चालक झिकझ्याक पद्धतीने गाडी चालवताना आर्वी नायावर दिसून आला. वाहतूक पोलिस अंमलदार संतोष राठोड यांनी त्याला गाडी चालवीण्याच्या परवाण्याची मागणी केली असता तो दारू ढोसुन असल्याचे लक्षात आले. त्यावरून त्याची दारू पिल्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस हवालदार संतोष राठोड यांच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्यात आला. बिना नंबरची दुचाकी जप्त करण्यात आली. वाहन दारूच्या नशेमध्ये चालवू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करून वाहन जप्त करण्यात येईल असे आवाहान वाहतूक पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे.