भन्नाट प्रयोग! एका फांदीवर वांगी तर दुसऱ्या फांदीवर टोमॅटो

अ‍ॅग्रो पायलट डॉट एआयचे CEO डॉ. प्रशांत मिश्रा यांचा तरुण भारतशी विशेष संवाद

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
 मिनल चतुरपाळे 
 
नागपूर,
Dr. Prashant Mishra नागपूरमध्ये सुरू झालेल्या 16व्या अ‍ॅग्रोव्हिजन कृषी महोत्सवात एआय तंत्रज्ञानाचा भन्नाट तडका पाहायला मिळाला. मायक्रोसॉफ्ट रिसर्च व ऑक्सफर्डच्या संयुक्त संशोधनातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून एका झाडावर वांगी आणि टोमॅटो एकाच वेळी उगविण्याचा  प्रयोगाची माहिती देण्यात आली. हा प्रयोग बारामती विज्ञान संस्थेत अ‍ॅग्रो पायलट डॉट एआयचे CEO डॉ. प्रशांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यांनी तरुण भारतशी विशेष संवाद साधाला. 
 
 

Dr. Prashant Mishra 
अ‍ॅग्रोव्हिजन Dr. Prashant Mishra  ही फक्त कृषी प्रदर्शनी नसून ग्रामीण प्रगतीची चळवळ आहे, असा विश्वास व्यक्त करत डॉ. मिश्रा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कौतुक केले. 2007 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि उद्योजकतेची दिशा मिळत असल्याचे ते म्हणाले.
 
 
कसा झाला प्रोयोग?
 
 
डॉ. मिश्रा म्हणाले Dr. Prashant Mishra  की, ग्राफ्टिंग ही पद्धत जुनी असली, तरी एआयचा वापर करून पिकांचे जीनोम सिक्वेन्सिंग, फर्टिलायझरचा परिणाम, पाण्याची गरज आणि पिकाच्या वाढीचे विश्लेषण अत्यंत अचूकपणे करता येते. वांगी आणि टोमॅटो या दोन्ही पिकांचा C4 वर्गातील समान गुणधर्म लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेल्या या प्रयोगातून एका झाडावरून तब्बल दोन किलो टोमॅटो आणि एक डझन वांगी घेण्यात आली. पाण्याची बचत, कमी जागेत अधिक उत्पन्न आणि उत्पादनात 3 पट वाढ—असे अनेक फायदे या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना मिळू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष AI किट आणि WhatsApp सहाय्य प्रणालीही तयार करण्यात आली आहे. पाणी किती द्यावे, खत किती टाकावे, झाडाची वाढ कशी आहे, कोणती उपाययोजना आवश्यक आहे—या सर्व गोष्टींबाबत एआय सतत मार्गदर्शन करणार आहे. चवीत कोणताही बदल होत नसून उत्पादनाचा टप्पा वाढतो, आणि कीटकनाशकांची गरजही लक्षणीय कमी होते, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.
 
 
 
उपक्रमाचा अभिमान 'गडकारींचा भक्त' 
आपल्या भावना Dr. Prashant Mishra  व्यक्त करताना डॉ. प्रशांत मिश्रा म्हणाले, “अ‍ॅग्रोव्हिजनमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होते. नितीन गडकरी हे खरे शेतकरी नेते आहेत. ते जे सांगतात ते कृतीतून दाखवतात. मी भंडारा जिल्ह्याचा असल्याने मला या उपक्रमाचा अभिमान आहे. मी स्वतः नितीन गडकरी यांचा भक्त आहे.”अ‍ॅग्रोव्हिजनमधील हा एआय आधारित प्रयोग कृषी क्षेत्रातील नव्या क्रांतीची नांदी ठरत असून, छोट्या शेतकऱ्यांपासून मोठ्या उत्पादकांपर्यंत सर्वांसाठी नवा मार्ग दाखवणारा आहे.