मुंबई,
Gauri Palve Garje's father's request राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे वैयक्तिक सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे हा निर्णय घ्यावा लागला. परंतु, कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबाबत हत्या झाल्याचा आरोप केला होता.
संग्रहित फोटो
सोमवारी अहिल्यानगरमधील मोहोज देवढे या मूळगावात गौरी पालवे गर्जे यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात आले. या पार्थिवावर पालवे कुटुंबीयांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच अग्निसंस्कार करण्याची मागणी केली, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. पोलीसांनी वेळेत मध्यस्थी करून वाद मिटवला आणि अंत्यसंस्कार अनंत गर्जे यांच्या घराजवळच पार पडला.
अंत्यसंस्काराच्या वेळी गौरी पालवे यांचे वडील भावनिक झाले. त्यांनी पोलीसांसमोर रडत आर्तपणे विनंती केली, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका." हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. पूर्वी पालवे कुटुंबीयांना अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी सुरुवातीला पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे नाकारले होते. मात्र पोलिसांनी अटक झाल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी समजूत घेतली आणि पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडला.
दरम्यान, रविवारी रात्री १ वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. त्यांच्या विरोधात स्वत:ला मारहाण आणि गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या अनंत गर्जे यासह त्यांच्या भाव आणि बहिणीवरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आज न्यायालयात त्यांची हजर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी अनंत गर्जे यांच्या घरावर झाडाझडती सुरू केली असून, या तपासातून कोणते महत्त्वाचे पुरावे मिळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.