गोंदिया,
Gondia vandalism नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असताना शहरातील संवेदनशील प्रभाग क्रमांक 22 मधील गौतम नगर, बाजपेयी वॉर्ड परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास सर्व सार्वजनिक नळांसह अनेकांच्या घरघुती नळांची तोडफोड केल्याचे सोमवार 24 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच ही घटना नियोजित आहे का, यामागे राजकीय वैमनस्य की इतर कोणते षडयंत्र? यावर चर्चा रंगली आहे. तर रात्रभरात परीसरातील पाणीपुरवठा ठप्प करण्यामागे नेमके काय उद्देश आहे? असे अनेक प्रश्न यानिमीत्ताने निर्माण होत आहेत.
रविवारी Gondia vandalism रात्रीच्या सुमारास काही समाज कंठकांनी सार्वजनिक नळांसह घरगुती नळांची तोडफोड करून नासधूस केल्याने नागरिकांचा संताप उसळला पहाटेच ही घटना उघडकीस येताच शेकडो नागरिकांनी एकत्र येत थेट पोलिस ठाण्याकडे कूच केली व तक्रार नोंदविली. यावेळी नागरिकांनी सांगितले की, गौतम नगरात शांततेची परंपरा आहे पण जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा तपास तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पोलिसांकडून आसपासच्या सीसीटिव्ही फुटेज, स्थानिकांच्या सूचना व संशयितांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
पाण्यासाठी नागरीकांची धावपळ
तोडफोड झालेल्या नळांची दुरुस्ती अद्याप सुरू नसून नागरिक पाण्यासाठी हवालदिल आहेत. वातावरण तणावपूर्ण असल्याने पोलिसांनी गस्ती वाढवली आहे. या कृत्यामागील मुख्य सूत्रधार कोण?उद्देश काय? कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील तपासातून समोर येणार आहेत आणि पूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणावर लागले आहे. मात्र, परीसरातील नागरीकांची पाण्यासाठी धावपळ दिसून येत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
गौतम नगर परिसरात Gondia vandalism सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची व पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी नागरिक अनेक वर्षे सातत्याने करत आहेत, परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे गुन्हेगारांचे मनोबल अधिकच वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.