कॅनडाला फिरायला गेलेल्या भारतीयाची विधार्थिनींशी घाणेरडी वर्तणूक; होणार डिपोर्ट

    दिनांक :24-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
indian-tourist-in-canada-misbehaves कॅनडाला पर्यटनासाठी गेलेल्या ५१ वर्षीय भारतीय नागरिकावर गंभीर आरोपांनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ओंटारियो प्रांतातील सरनिया परिसरात दोन किशोरवयीन मुलींशी केलेल्या अनुचित वर्तनामुळे त्याला दोषी ठरवण्यात आले असून, कोर्टाने त्याला भारतात डिपोर्ट करण्याचा आणि भविष्यात कॅनडामध्ये प्रवेशबंदी लावण्याचा निर्णय सुनावला आहे.

indian-tourist-in-canada-misbehaves 
 
जगजीत सिंह हा जुलै महिन्यात आपल्या नातवाला भेटण्यासाठी कॅनडाला आला होता. मात्र, येथे आल्यानंतर तो एका स्थानिक हायस्कूलजवळील स्मोकिंग क्षेत्रात नियमितपणे येऊ लागला. तपासात समोर आले की तो वारंवार शाळकरी मुलींच्या जवळ जाऊन त्यांच्याशी अश्लील वर्तन करत होता. मुलींचा पाठलाग करणे, त्यांच्यासोबत विनापरवानगी फोटो घेण्याचा प्रयत्न करणे, तसेच ड्रग्स आणि दारूबद्दल चर्चा करणे अशा अनेक तक्रारी त्याच्याविरुद्ध करण्यात आल्या. indian-tourist-in-canada-misbehaves ८ ते ११ सप्टेंबरदरम्यान तोकड्या अंतरावरून मुलींना त्रास देण्याच्या घटना वाढल्या. एका मुलीने सांगितले की, फोटो काढल्यावर तो निघून जाईल या अपेक्षेने त्यांनी अनिच्छेने फोटोला परवानगी दिली. मात्र, त्यानंतर त्याने मुलीच्या वैयक्तिक जागेत हात घालून तिच्या मानेला हात घालण्याचा प्रयत्न केला. शाळा सुटल्यानंतर तो मुलींचा पाठलागही करत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
१६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली आणि लैंगिक अत्याचार व लैंगिक हस्तक्षेपाचे आरोप ठेवले. त्यानंतर त्याला जामीन मिळाला; तथापि त्याच दिवशी नवीन तक्रार नोंदवल्यानंतर पुन्हा एकदा त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात सुनावणीदरम्यान त्याने मोठ्या आरोपांना नकार दिला, परंतु क्रिमिनल हॅरेसमेंटच्या कमी गंभीर आरोपाला स्वतःला दोषी मानले. जज क्रिस्टा लिन लेस्झिंस्की यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की अशा प्रकारचे वर्तन कधीही सहन केले जाणार नाही. न्यायालयाने सिंहला डिपोर्ट करण्याचा आदेश दिला असून कॅनडामध्ये त्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. indian-tourist-in-canada-misbehaves याशिवाय, पुढील तीन वर्षांसाठी त्याच्यावर कठोर प्रोबेशन ठेवण्यात आले आहे. या काळात त्याला कोणत्याही मुलीशी संवाद साधणे, शाळा परिसरात किंवा विद्यार्थ्यांशी संबंधित कोणत्याही ठिकाणी जाणे पूर्णपणे मनाई आहे. या निर्णयानंतर सिंहला कॅनडातून भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.