गोंदिया,
gondia news सालेकसा तालुक्यातील विचारपूर येथे एका घरातून सोने चांदीचे दागिने व रोकड असे 1.51 लाख रुपयांची चोरी करणार्या चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरी केलेले दागिणे व रोकड असा 1.40 लाख रुपयांचा मुद्दमाल हस्तगत केला आहे.
कमलेश सुधाकर राऊत (37) रा. गॉडप्लॉट, वर्धा, जि. वर्धा, लखन नाता बोरसे (32) रा. अशोकनगर वार्ड क्र. 28 वर्धा, राजु अवधुत वासकर (32), नरेंद्र वासुदेव वझे, (39) दोघेही राहणार कान्होलीबारा, ता. हिंगणा, जि. नागपूर व रामेश्वर सुखराम नागपुरे रा. चिचोली, जि. बालाघाट (म.प्र.) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या पाचही आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके पाठवण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलकसा तालुक्यातील विचारपूर (दरेकसा) येथील नारायण गोरेलाल पांधरे (41) हे 14 नोव्हेंबर रोजी रात्री आपल्या घरी कुटुंबासह झोपले असता अज्ञात चोरांनी त्यांच्या जुन्या घराच्या दाराचे कुलूप तोडुन रुममधील टिनाच्या पेटित ठेवलेले 86 हजार रुपये रोख, कपाटात ठेवलेले सोन्याचे कानातील टॉप्स, मंगळसुत्र 51 हजार 500 रुपये, जुने वापरते पायातील चांदीच्या पैजण, 20 तोळे किमत 14 हजार रुपये असा एकूण 1 लाख 51 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान,सदर गुन्ह्याचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असताना गुप्त माहीती व तांत्रीक विश्लेषणच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी कमलेश राऊत व रामेश्वर नागपूरेया दोघांसह त्यांच्या साथीदारांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.gondia news या आधारे स्थानिक गुन्हे शाखातर्फे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी तीन वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, गुप्त माहीतीच्या पोलिसांनी आरोपी कमलेश राऊत व लखन बोरसे या दोघांना वर्धा येथून त्यांच्या घरून तर राजु वासकर, नरेंद्र वझे या दोघांना कान्होलीबारा, ता. हिंगणा जि. नागपूर येथून त्यांच्या घरून ताब्यात घेण्यात आले. तर आरोपी रामेश्वर नागपुरे यास मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील त्याच्या चिचोली गावातून अटक करण्यात आली. सर्व पाचही आरोपींनी गुन्हा कबून केला असून त्यांच्या ताब्यातून सोने चांदीचे दागिणे व 20 हजार रुपये रोख असा 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी सर्व आरोपींना सालेकसा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.