वाशीम,
Leopard killed in collision with unknown vehicle वाशीम - मालेगाव मार्गावर रस्ता ओलांडतांना सावरगाव बर्डे गावानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठर तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत सविस्तर असे की, वाशीम - मालेगाव मार्गावर सतत वाहनांची रहदारी असते. याच दरम्यान २३ नोव्हेंबर च्या रात्री दरम्यान दोन बिबट रस्ता ओलांडत असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत एक बिबट जागीच ठर झाला तर दुसरा बिबट गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होवून मृतक बिबट्याला ताब्यात घेतले व घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमी बिबट्याला उपचारासाठी नेण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी सावरगाव बर्डे व परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.